मुंबई | अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा युवा 21 वर्षीय फलंदाज इब्राहीम झद्रान याने इतिहास रचला आहे. इब्राहीमने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकत कीर्तीमान केला आहे. इब्राहीम वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिला अफगाणि फलंदाज ठरला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. इब्राहीम आधी अशी कामगिरी अफगाणिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला जमली नव्हती. इब्राहीमने या शतकादरम्यान चिवट झुंज दिली. त्यामुळे अफगाणिस्तानच्या डावाला मजबूती मिळाली.
इब्राहीमने 131 चेंडूंमध्ये 77.1 च्या स्ट्राईक रेटने हे शतक केलं. इब्राहीमने या शतकादरम्यान 7 चौकार ठोकले. तसेच एकेरी-दुहेरी धावाही घेतल्या. इब्राहीमच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पाचवं आणि वर्ल्ड कपमधील पहिलवहिलं शतक ठरलं. सलामीला आलेल्या इब्राहीमने सुरुवातीपासून संधी मिळेल तशी फटकेबादी केली. इब्राहीमने परिस्थितीनुसार खेळ करत शतकापर्यंत मजल मारली. या दरम्यान दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानचे फलंदाज आऊट होत होते. मात्र इब्राहीमने एक बाजू लावून धरत अफगाणिस्तानला बॅकफुटवर येऊ दिलं नाही.
दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा हा वर्ल्ड कप 2023 मधील आठवा सामना आहे. अफगाणिस्तानने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने गेले 3 सामने सलग जिंकलेत. तर ऑस्ट्रेलियाने पहिले 2 सामने गमावले. त्यानंतर कांगारुंनी जोरदार मुसंडी मारत सलग 5 सामने जिंकलेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सेमी फायनलच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा असा आहे.
इब्राहीमचं ऐतिहासिक शतक
When he got there! 🤩💯
Incredible stuff! @IZadran18 👏#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvAUS | #WarzaMaidanGata pic.twitter.com/l6A1PlZTXQ
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 7, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.