T20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्याचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचा सामना कुणासह?

| Updated on: Aug 27, 2024 | 11:46 PM

Womens T20 World Cup 2024 warm up fixtures: आयसीसीकडून वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या सुधारित वेळापत्रकानंतर सराव सामन्यांचंही वेळापत्रक जाहीर केलं आहे.

T20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्याचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचा सामना कुणासह?
Womens india vs australia
Image Credit source: Icc X account
Follow us on

आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. आयसीसीने सोमवारी 26 ऑगस्ट रोजी या स्पर्धेतील सर्व सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात ही 3 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर 20 ऑक्टोबरला होणार आहे. एकूण 18 दिवसांमध्ये 10 संघात 23 सामने होणार आहेत. एकूण 10 संघाना 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानंतर मंगळवारी 27 जानेवारी रोजी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आता आयसीसीने वर्ल्ड कपआधी सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार टीम इंडियाला 2 सामने खेळावे लागणार आहेत. सराव सामन्यांमुळे टीम इंडियाला तेथील खेळपट्टीचा चांगली माहिती होईल.

एकूण 10 संघ प्रत्येकी 2 सराव सामने खेळणार आहे. सराव सामन्यांना 28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.पहिल्या दिवशी 2 सामने होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलँड आणि श्रीलंका-बांगलादेश आमनेसामने असणार आहेत.वूमन्स टीम इंडियाचे दोन्ही सराव सामने हे दुबईत होणार आहेत. टीम इंडियासमोर पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. पहिला सामना हा 29 सप्टेंबर तर दुसरा सामना 1 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

तसेच मुख्य स्पर्धेतील पहिल्या दिवशी अर्थात 3 ऑक्टोबरलाही 2 सामने होणार आहेत. सलामीच्या सामन्यात बांगलादेश-स्कॉटलँड भिडणार आहेत. तर दिवसातला दुसरा सामना पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात होणार आहे.

दरम्यान एकूण 10 पैकी 4 संघांनी आतापर्यंत खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या 4 संघात इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा समावेश आहे. तर इतर 6 संघ येत्या काही दिवसात खेळाडूंची नावं जाहीर करणार आहेत.

सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मनधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर)*, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील* आणि सजना सजीवन.