Icc Champions Trophy : पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार, आता भारताचे सामने कुठे? जाणून घ्या

| Updated on: Nov 07, 2024 | 11:36 PM

Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानात करण्यात आल्याने भारताने तिथे जाऊन खेळण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. अशात आता या स्पर्धेला काही दिवस बाकी असताना मोठी अपडेट समोर आली आहे.

Icc Champions Trophy : पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार, आता भारताचे सामने कुठे? जाणून घ्या
babar azam and Rohit sharma india vs pakistan
Image Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
Follow us on

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा शेजारी पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानात न जाण्याच्या निर्णयावर ठाम आहे. बीसीसीआय टीम इंडियाला सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. मात्र त्यानंतरही टीम इंडिया पाकिस्तानात येईल, अशी भाबडी आशा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे. त्यामुळे पीसीबीने ड्राफ्ट शेड्युलमध्ये टीम इंडियाच्या सामने हे लाहोरमध्ये खेळवण्याचं निश्चित केलं. मात्र भारतासमोर अखेर पाकिस्तानला माघार घ्यावी लागल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कार्यक्रमात बदल करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे.

पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारताचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. भारताचे सामने हे यूएईत होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा की टीम इंडियामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हे हायब्रिड मॉडेलनुसारच होण्याची चिन्हं आहेत. याआधी अशाचप्रकारे भारताचा 2023 मध्ये आशिया कपसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार होता. तेव्हा भारतीय संघाचे सामने हे श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.

भारताचे सामने कुठे?

पीटीआयला पीसीबीच्या एका विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकार टीम इंडियाला पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी देणार नाही, असं असलं तरी या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कार्यक्रमात थोडा बदल केला जाऊ शकतो. टीम इंडिया दुबई आणि शारजाहमध्ये मॅच खेळण्यास तयार होईल, असा विश्वास पीसीबीला आहे. त्यामुळे आता याबाबत बीसीसीआय अंतिम निर्णय काय घेते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

आशिया कप प्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफी!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक केव्हा?

दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं वेळापत्रक हे येत्या 11 नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आयसीसीने पुढील आठवड्यापर्यंत ड्राफ्ट शेड्युल हेच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक म्हणून जाहीर करावं, यासाठी पीसीबी आग्रही आहे. मात्र आता आयसीसी काय निर्णय घेते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.