आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये नियोजित आहेत. त्यामुळे बीसीसीआयचा टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी तीव्र विरोध आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उभयसंघात द्विपक्षीय मालिका होत नाहीत. तसेच भारतीय संघ पाकिस्तान दौरा करत नाहीत. टीम इंडियाने गेल्या वर्षीही पाकिस्तानमध्ये आशिया कपमधील सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी म्हणून श्रीलंकेत करण्यात आलं होतं. अशात आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारचीय संघांचे सामने हे यूएईमध्ये खेळवण्यात येऊ शकतात. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 15 फेब्रुवारी के 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये नियोजित करण्यात आलं आहे. त्यानुसार लाहोर,कराची आणि रावळपिंडी येथे हे सामने होणार आहेत.
‘आउटलेट दी टेलीग्राफ’च्या रिपोर्टनुसार, टीम इंडियाचे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामने हे यूएईत खेळवण्यात येऊ शकतात. तसेच टीम इंडिया फायनलमध्ये पोहचल्यास ट्रॉफीसाठीचा सामना हा दुबईत खेळवला जाऊ शकतो. तर नियोजिनानुसार चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना हा लाहोर येथे खेळवण्यात येणार आहे. तसेच टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत करावेत, असा प्रस्ताव आहे. दुबई भारत-पाकिस्तान सीमेपासून जवळ आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियासह, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ एका गटात आहेत.
आशिया कप 2023 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. मात्र टीम इंडियाचे या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने आणि फायनलचं आयोजन हे श्रीलंकेत करण्यात आलेलं. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 2012-2013 पासून द्विपक्षीय मालिका होत नाही. तसेच दोन्ही संघ हे फक्त आयसीसी स्पर्धेत आणि आशिया स्पर्धेच एकमेकांविरुद्ध खेळतात.
टीम इंडिया पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येईल, अशी आशा पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी व्यक्त केली होती. तसेच टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले होते. आता याबाबत काय निर्णय होतो? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.