क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होती ती वेळ अखेर आली. आयसीसीने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचं 2017 नंतर यंदा पहिल्यांदाच आयोजन केलं आहे. गतविजेत्या पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र टीम इंडियाचे सामने हे सुरक्षेच्या कारणामुळे दुबईत होणार आहेत. तसेच टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचली तर तो सामनाही दुबईत होईल अन्यथा लाहोरमध्ये खेळवण्यात येईल.
या स्पर्धेसाठी 8 संघांची 4-4 नुसार 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. त्यानुसार प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळेल. त्यानुसार, टीम इंडिया या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. त्यानंतर बहुप्रतिक्षित आणि हायव्होल्टेज सामना असणार आहे. इंडिया-पाकिस्तान सामना होईल. तर साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा न्यूझीलंडविरुद्ध पार पडेल. या स्पर्धेतील सर्व सामने हे डे-नाईट असणार आहेत. सामन्यांना दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
The ICC Champions Trophy 2025 fixtures are out 🙌#TeamIndia 🇮🇳 set to play their matches in the UAE 💪
We begin our campaign with a clash against Bangladesh on 20th February, 2025 👍 pic.twitter.com/Lg46S3Ykwm
— BCCI (@BCCI) December 24, 2024
इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई
सेमी फायनल 1, 4 मार्च, दुबई
सेमी फायनल 2, 5 मार्च, लाहोर
अंतिम सामना, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई
10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)
दरम्यान आता वेळापत्रक जाहीर केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाची घोषणा केव्हा केली जाणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ही एकदिवसीय मालिका एकाप्रकारची रंगीत तालिम असणार आहे. इंग्लंडने भारत दौरा आणि चॅमियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र अद्याप बीसीसीआय निवड समितीने मायदेशातील मालिकेसाठीही संघ जाहीर केलेल नाही. त्यामुळे आता केव्हा भारतीय संघ जाहीर होतो, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.