IND vs ENG : भारत-इंग्लंड सामन्याआधी पिच रिपोर्ट, आज निकाल वेगळा लागणार कारण..

| Updated on: Oct 29, 2023 | 9:32 AM

IND vs ENG Pitch Report : भारत आणि इग्लंडमध्ये वर्ल्ड कपमधील सामना पार पडणार आहे. या सामन्यामध्ये भारताचं पारडं जड मानलं जात आहे. भारताने आजच्या सामन्यात विजय मिळवला तर पॉईंट टेबलमध्ये टॉप मारणार आहे. तर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे.

IND vs ENG : भारत-इंग्लंड सामन्याआधी पिच रिपोर्ट, आज निकाल वेगळा लागणार कारण..
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील 29 वा सामना भारत आणि इंग्लड यांच्यात पार पडणार आहे. लखनऊमध्ये हा सामना होणार असून भारत विजयाच्या डबल हॅट्रीकसाठी सज्ज आहे. या वर्ल्ड कपमधीस लखनऊमध्ये तीन सामने झाले असून स्पिनर्सला मोठी मदत मिळाली आहे. तर आजच्या सामन्याआधी पिच रिपोर्ट कसा आहे जाणून घ्या.

पिच रिपोर्ट

आज होणारा सामना दुसऱ्या पिचवर होणार असून तिथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची जास्त शक्यता आहे. कारण नवीन पिच लाल मातीने बनवल्याने त्यावर चांगला बाऊन्स आणि स्पीड गोलंदाजांना मिळू शकतं. एकंंदरित आजच्या सामन्यामध्ये गोलंदाजांसाठी चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. लखनऊच्या मैदानावर झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये स्पिनर्सने 4.79 च्या ईकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. तर फास्टर्सनी 5.63 च्या ईकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. बाकी सामन्यांच्या बरोबरीने या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी जास्तीच्या धावा दिल्या आहेत.

लखनऊच्या स्टेडियममध्ये आतापर्यंत सात एकदिवसीय सामने झाले आहेत. यामधील चार सामन्यांमध्ये चेस करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे. या सात सामन्यांमध्ये फक्त एकदाच 300 धावांट टप्पा पार झाला आहे. तर सर्वात कमी धावसंख्या 177 असून जी ऑस्ट्रेलियाने केली होती.

आयपीएलमध्ये ही खेळपट्टी सर्वात वादग्रस्त आणि खराब दिसली होती. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी या मैदानावर नवीन खेळपट्टी बनवण्यात आली आहे. जानेवारीमध्ये झालेल्या भारत-न्यूझीलंड सामन्यानंतर या खेळपट्टीच्या क्युरेटरला काढण्यात आलं होतं. आजच्या सामन्यात खेळपट्टी कशी राहते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:-

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.