हरारे | सध्या क्रिकेट चाहत्यांना वनडे वर्ल्ड कप 2023 चं वेध लागले आहेत. आयसीसीने या स्पर्धेसाठी 27 जून रोजी वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला महाअंतिम सामना खेळवण्यात येईल. वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना आणि अंतिम सामना ह अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. एकूण 10 संघांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
वर्ल्ड कपसाठी 10 पैकी 8 संघ ठरले आहेत. तर बाकी 2 संघांसाठी झिंबाब्वेत आयसीसी क्रिकेट वर्ल्ड क्वालिफायर खेळवण्यात येत आहे. या क्वालिफायरमध्ये 10 संघांपैकी 6 संघांनी सुपर 6 मध्ये धडक दिली आहे. या 6 संघांतून पहिले 2 संघ वर्ल्ड कप मुख्य सामन्यांसाठी पात्र ठरतील. या वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये एकसेएक सामने पाहायला मिळत आहेत.
बुधवारी 27 जून रोजी या क्वालिफायरमध्ये आयर्लंड विरुद्ध यूएई यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग याने मैदान गाजवलं. स्टर्लिंगने यूएईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यूएईने टॉस जिंकून आयर्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आयर्लंडने स्टर्लिंगच्या 162 धावांच्या खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 349 धावा केल्या. त्यामुळे यूएईला विजयासाठी 350 धावांचं राउंड फिगर आव्हान मिळालं.
यूएईचा बाजार 39 ओव्हरमध्ये 211 धावांवरच उठला. त्यामुळे आयर्लंडचा 138 धावांनी विजय झाला. थोडक्यात सांगायचं तर हा सामना यूएई विरुद्ध पॉल स्ट्रर्लिंग असा झाला. यूएईच्या पूर्ण टीमला एकट्या पॉलने केलेल्या धावाही करता आल्या नाहीत.
आयर्लंडच्या पॉल स्ट्रलिंग याची मानाच्या यादीत एन्ट्री
Paul Stirling joins Tamim Iqbal on the list.#Cricket #PaulStirling #ODI pic.twitter.com/cO8WtdSDFg
— CricTelegraph (@CricTelegraph) June 28, 2023
पॉलने 134 बॉलमध्ये 15 चौकार आणि 8 खणखणीत सिक्सच्या मदतीने 162 धावा केल्या. पॉलने सिक्स आणि फोरच्या मदतीने फक्त 23 बॉलमध्ये 108 धावा केल्या. पॉलच्या या खेळीच्या जोरावर आयर्लंडचा विजय एकतर्फी झाला. आयर्लंडने या क्वालिफायर राउंडमधील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड केला. मात्र आयर्लंडचं वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होण्याचं स्वप्न अखेर अधुरचं राहिलं.
आयर्लंड प्लेइंग इलेव्हन | अँड्रयू बालबर्नी (कॅप्टन), पॉल स्टर्लिंग, अँडी मॅकब्राईन, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी आणि जोशुआ लिटल.
संयुक्त अरब अमीराती प्लेइंग इलेव्हन | मुहम्मद वसीम (कॅप्टन), आर्यांश शर्मा (विकेटकीपर), वृत्य अरविंद, एथन डीसूझा, बासिल हमीद, अली नसीर, अयान अफजल खान, संचित शर्मा, कार्तिक मयप्पन, जुनैद सिद्दीक आणि मुहम्मद जवादुल्ला.