हरारे | आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघ ठरले आहेत. तर उर्वरित 2 संघ हे आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर फेरीतून निश्चित होणार आहे. या 2 जागांसाठी 10 संघांत वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून आता सुपर 6 मध्ये प्रवेश झाला आहे. तर 4 संघांचं स्वप्न भंगलंय.
वर्ल्ड कप क्वालिफायर सुपर 6 फेरीला आजपासून (29 जून) सुरुवात झाली. या सुपर 6 मधील पहिला सामना झिंबाब्वे विरुद्ध ओमान यांच्यात खेळवण्यात आला. झिंबाब्वेने साखळी फेरीनंतर सुपर 6 मध्येही विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. झिंबाब्वेने ओमानवर 14 धावांनी विजय मिळवला. झिंब्बावेने ओमानला विजयासाठी 333 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ओमानला 50 ओव्हरमध्ये कश्यप प्रजापती याच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 318 धावाच करता आल्या.
ओमानकडून कश्यप प्रजापती याने सर्वाधिक 103 धावांची शतकी खेळी केली. तर जतिंदर सिंह आणि कलीमुल्ला या दोघांचा अपवाद वगळता सर्वांना चांगली सुरुवात मिळाली. ओमानच्या फलंदाजांनी चांगला प्रयत्न केला. मात्र ओमनाला विजयासाठी अवघ्या 14 धावा कमी पडल्या. झिंबाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी आणइ तेंडाई चतारा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. रिचर्ड नगारवा याने 2 विकेट्स घेतल्या. सिंकदर रजा याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.
त्याआधी ओमनने टॉस जिंकून झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झिंबाब्वेने सिन विलियम्स याने 142 धावांची शतकी खेळी केली. सिनच्या शतकी खेळीच्या जोरावर झिंबाब्वेने 7 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 332 धावा केल्या. तसेच इतर फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्या खेळीचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्यात अपयश आलं. दरम्यान आता 30 जून रोजी सुपर 6 मधील दुसरा सामना हा नेदरलँड विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
झिंबाब्वे प्लेइंग इलेव्हन | क्रेग एर्विन (कॅप्टन), जॉयलॉर्ड गुम्बी (विकेटकीपर), वेस्ली माधवेरे, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, रायन बर्ल, वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, रिचर्ड नगारावा, तेंडाई चतारा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.
ओमान प्लेइंग इलेव्हन | झीशान मकसूद (कर्णधार), कश्यप प्रजापती, जतिंदर सिंग, आकिब इलियास, मोहम्मद नदीम, शोएब खान, अयान खान, नसीम खुशी (विकेटकीपर), फय्याज बट, कलीमुल्ला आणि बिलाल खान.