त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात पहिला टी 20 सामना हा 3 ऑग्स्ट रोजी पार पडला. विंडिजने हा सामना 4 धावांनी जिंकून विजयी सलामी दिली. विंडिजने विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र विंडिजने टीम इंडियाला 145 रन्सवर रोखलं. वेस्ट इंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. विजयी सुरुवात झाल्याने विंडिजच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तर टीम इंडियाला पुन्हा एकदा रोहित-विराटच्या अनुपस्थितीत जिंकणं अवघड झाल्याचं सिद्ध झालंय. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे.
आयसीसीने पहिल्या टी 20 सामन्यानंतर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजवर दंडात्मक कारवाई केली आहे. दोन्ही संघांनी ओव्हर रेट न राखल्याने आयसीसीने हा कारवाई केली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, सामन्यादरम्यान ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हर्स टाकणं बंधनकारक असतं. मात्र वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया दोन्ही संघानां तसं करणं शक्य झालं नाही. यामुळे आयसीसीने दंड ठोठावला.
टीम इंडियाने बॉलिंग दरम्यान अपेक्षित वेळेत 1 ओव्हर कमी टाकली. त्यामुळे सामन्याच्या एकूण मानधनाच्या 5 टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. तर विंडिजने 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे विंडिजच्या प्रत्येक खेळाडूच्या सामन्यातील मानधनाच्या 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून कापण्यात येणार आहे. आयसीसीच्या 2.22 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
आयसीसीकडून विडिंज आणि टीम इंडियावर कारवाई
India and West Indies have pleaded guilty and accepted the proposed sanctions ?
— ICC (@ICC) August 4, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.
दरम्यान या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा 6 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडिज दुसरा सामन्यातही विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.