ICC | वर्ल्ड कप सेमी फायनलला अवघे काही तास, टीम इंडियाला आयसीसीकडून मोठं दिवाळी गिफ्ट

| Updated on: Nov 13, 2023 | 12:40 PM

ICC Hall of Fame 2023 : वर्ल्ड कप उंचावण्यापासून भारतीय संघ दोन विजय दूर असून भारत संपूर्ण स्पर्धेत अपराजित आहे. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने एन्ट्री मारल्यावर आयसीसीने विजय मिळवला आहे.

ICC | वर्ल्ड कप सेमी फायनलला अवघे काही तास, टीम इंडियाला आयसीसीकडून मोठं दिवाळी गिफ्ट
Follow us on

मुंबई  : वर्ल्ड कप 2032 मध्ये भारतीय संघ चमकदार कामगिरी करत असून लीग स्टेजमधील नऊच्या नऊ सामने जिंकत भारत एकच संघ आहे जो अपराजित राहिला आहे.  भारताने शेवटच्या नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला. आता सेमी फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. अशातच आयसीसीकडून एक आनंदाची बातमी आली आहे. आयसीसीने (आयसीसी हॉल ऑफ फेम) ICC Hall of Fame मध्ये भारताच्या दोन खेळाडूंना स्थान दिलं आहे.

कोणाला मिळालं स्थान

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह तीन माजी क्रिकेटपटूंना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे. सेहवाग व्यतिरिक्त माजी भारतीय क्रिकेटपटू डायना एडुलजी आणि माजी महान श्रीलंकेचा क्रिकेटपटू अरविंदा डी सिल्वा यांना हा आयसीसी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. भारतातील आणखी बरेच खेळाडू आधीच ICC हॉल ऑफ फेमचा भाग आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.

आयसीसीने यंदा तीन खेळाडूंना यामध्ये स्थान दिलं असून त्यामध्ये दोन भारतीय आणि एका श्रीलंकन खेळाडूचा समावेश आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, भारतीय महिला खेळाडू डायना एडुलजी आणि श्रीलंकेचा स्टार खेळाडू अरविंद डिसिल्वा यांचा समावेश आहे.सेमी फायनल सामन्यामध्ये वानखेडेचं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मैदानावर तिन्ही खेळाडूंचा सन्मान होणार आहे.

 

विरेंद्र सेहवाग भारताच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असून त्याने आपल्या 14 वर्षाच्या करियरमध्ये 17 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. भारताचा आक्रमक ओपनर ज्याने पहिल्या बॉलपासून आक्रमण करायला हवं हे सर्वांना दाखवून दिलं. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सेहवाहने महत्त्वाची भूमिका निभावली होती .

अरविंद डी सिल्वा, एडुलजी आणि सेहवाग अनुक्रमे 110, 111 आणि 112 व्या क्रमांकावर क्लबमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये भारताच्या विनोद मंकड, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे. श्रीलंकेकडून डी सिल्वा 19 वर्षे श्रीलंकेकडून खेळला, यामध्ये आठवणीतील म्हणजे 1996 साली श्रीलंकेने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी डी सिल्वा यानेही चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर 17 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या डायना एडुलजी या पहिल्या महिला भारतीय खेळाडू आहेत ज्यांना या क्लबमध्ये सामील झाल्या.