क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच अवघ्या काही दिवसांमध्येच मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने होणार असल्याचं समोर आलं आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. या आयसीसी चॅम्पियनशीप ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बीसीसीआयचा टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास विरोध होता. या मु्द्द्यावरुन अनेक महिने चांगलाच वाद पाहायला मिळाला. मात्र अखेर आयसीसीने हायब्रिड मॉडेलला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता या स्पर्धेतील सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याची गरज नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
रिपोर्ट्सनुसार, पीसीबी आणि बीसीसीआय यांच्या संमतीनंतर हायब्रिड मॉडेलला मंजुरी मिळाली आहे. हायब्रिड मॉडेलमुळे टीम इंडियाचे या स्पर्धेतील सामने त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये फक्त 10 सामनेच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच टीम इंडिया उपांत्य आणि अंतिम फेरीत पोहचली तर ते सामनेही दुबईत होतील. मात्र जर टीम इंडिया साखळी फेरीतूनच बाहेर झाली तर उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामने हे पाकिस्तानमध्येच होतील.
पाकिस्तानला एका बाबतीत दिलासा मिळाल्याचं म्हटलं जात आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 चं आयोजन हे भारत आणि श्रीलंका येथे करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान या टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतात येणार आहे. त्यामुळे पाकिस्तान त्यांचे सामने हे श्रीलंकेत खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
बीसीसीआय, झुकेगा नही साला!
🚨 ICC HAS APPROVED THE HYBRID MODEL FOR CHAMPIONS TROPHY 🚨
– Dubai will host India games in the Champions Trophy 2025. [Sports Tak]
Colombo will host the India vs Pakistan group game in the 2026 T20I World Cup. pic.twitter.com/kF27RHz8sg
— Johns. (@CricCrazyJohns) December 13, 2024
दरम्यान पाकिस्तानला 1996 नंतर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेचं यजमानपदाचा मान मिळाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. मात्र या स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच 7 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. याआधी 2017 साली झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.