मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तो निर्णय मागे घेत क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा दिला आहे. आयसीसीने रविवारी 28 जानेवारी रोजी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गूड न्यूज दिली आहे. आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं होतं. आयसीसीने हा बरखास्तीचा निर्णय मागे घेतला आहे. आयसीसीने एससीबीवरील बंदी उठवली आहे. आयसीसीने 2023 मध्ये वर्ल्ड कप दरम्यान सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे बंदी घातली होतली.
श्रीलंका क्रिकेट आयसीसीचा सदस्य आहे. मात्र नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसीने नोव्हेंबरमध्ये ही कारवाई केली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डात कोणतंही कामकाज हे सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय होणं अपेक्षित होतं पर्यायानं असतं. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या नियमांना फाटा दिला. त्यामुळे आयसीसीने दणका दिला.
आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर निलंबनानंतर पाहणी केली. त्यानंतर सदस्य राष्ट्र म्हणून श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून सुरळीतपणे कामकाज होत असल्याचं आयसीसीला विश्वास पटला. त्यामुळे आता आयसीसीने निलंबन मागे घेतलंय. याबाबतची माहिती क्रीडा मंत्री हरीन फर्नांडो यांन सोशल मीडियाद्वारे दिली. “आयसीसीने श्रीलंकेवर घातलेलं निलंबन तात्काळ हटवलं आहे. लवकरच याबाबतची प्रसिद्धपत्रक येईल”, असं ट्विट फर्नांडो यांनी केलं.
आयसीसीकडून श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा
The ban imposed by the ICC on Sri Lanka Cricket in November 2023 has been lifted.https://t.co/qDPp8I2CM6
— ICC (@ICC) January 28, 2024
दरम्यान आयसीसीने काही महिन्यांआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डावर निलंबिनाची कारवाई केल्यानंतर आणखी एक झटका दिला होता. आधी अंडर 19 टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन हे श्रीलंकेत करण्यात आलं होतं. अर्थात श्रीलंकेकडे या अंडर 19 वर्ल्ड कपचं यजमानपद होतं. मात्र आयसीसीने ऐनवेळेस श्रीलंकेऐवजी दक्षिण आफ्रिकेत अंडर 19 वर्ल्ड कपचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीलंकेला राजकीय हस्तक्षेपाचा चांगलाच फटका बसला. मात्र आता आयसीसीने बंदी उठवल्याने अखेर दिलासा मिळाला आहे.