मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला अजून काही महिने बाकी आहेत. मात्र त्यानंतरही क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कप स्पर्धेचं वेध लागले आहेत. आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही. मात्र ड्राफ्ट शेड्यूलनुसार, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या ट्रॉफीसाठी एकूण 10 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. त्याआधी आज 26 जून रोजी आयसीसीने वर्ल्ड कप ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलंय. या वर्ल्ड कप ट्रॉफीचं एकदम हटके अंदाजात अनावरण करण्यात आलंय. आयसीसी ट्रॉफीचं जमिनीपासून 1 लाख 20 हजार फूट उंचीवर अनावरण करण्यात आलं.
वर्ल्ड कप ट्रॉफीचं अनावरण झालं. त्यानंतर ट्रॉफी जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आली. यासह आयसीसी वर्ल्ड कप वनडे ट्रॉफी ही क्रीडा विश्वातील पहिलीच ट्रॉफी ठरली जीचं अवकाशात अनावरण करण्यात आलं. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी या वर्ल्ड कप ट्रॉफीच्या अनावरणाचा व्हीडिओ ट्विट केला आहे. आता ही ट्रॉफी एकूण 18 देशांचा दौरा करणार आहे.
आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीच्या 18 देशांच्या दौऱ्याला 27 जूनपासून सुरुवात होणार आहे. या 18 देशांमध्ये भारत, कुवैत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, फ्रान्स, इटली आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. हा 18 देशांचा दौरा आटोपल्यानंतर ही ट्रॉफी 4 सप्टेंबर रोजी भारतात परतेल.
आयसीसी ट्रॉफीची पहिली झलक
The #CWC23 Trophy in space ??
The ICC Men's Cricket World Cup 2023 Trophy Tour is HERE ? https://t.co/UiuH0XAg1J pic.twitter.com/48tMi6cuHh
— ICC (@ICC) June 26, 2023
या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. या दहापैकी 8 संघ ठरले आहेत. तर उर्वरित 2 म्हणजेच नवव्या आणि दहाव्या क्रमाकांसाठी आता एकूण दहासंघामध्ये चढाओढ सुरु आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड क्वालिफायर स्पर्धेत 10 टीममध्ये लढत आहे. यापैकी पहिल्या 2 संघाना वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या एकूण 8 संघांना वर्ल्ड कपच थेट तिकिट मिळालंय. तर 2 जागांसाठी 10 संघात चढाओढ आहे. या दहा संघांमध्ये झिंबाब्वे, वेस्टइंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, अमेरिका आणि यूएई संघांचा समावेश आहे.
वर्ल्ड कपचं वेळापत्रक केव्हा येणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिलंय. आयसीसी वर्ल्ड कप 2023 वेळापत्रक हे 27 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळापत्रकाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.