मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारी 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाने या कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी कसून सराव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे 2 खेळाडू आमनेसामने आले आहेत. हा विषय इतका कसोटीचा झालाय की यात आयसीसीच मध्यस्थी करणार आहे. या दोन्ही भारतीय खेळाडूंबाबत आयसीसी निर्णय घेणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने ‘प्लेअर ऑफ द मन्थ’ या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केले आहेत. जानेवारी महिन्यातील या पुरस्कारासाठी एकूण 3 खेळाडूंना नामांकित करण्यात आलंय. त्यापैकी 2 भारतीय खेळाडू आहेत. या दोघांमध्ये प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी रस्सीखेच आहे.
एका पुरस्कारांसाठी टीम इंडियाचे दोन्ही खेळाडू प्रबळ दावेदार आहेत. मात्र पुरस्कार कुणा एकालाच मिळणार. या पुरस्कारासाठी कडवी झुंज आहे. त्यामुळे आता ‘प्लेअर ऑफ द मंथ’ कोणाला ठरवायचं हे आयसीसीने ठरवणार आहे.
टीम इंडियाच्या या 2 खेळाडूंपैकी 1 गोलंदाज आहे तर 1 फलंदाज. मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल या दोघांमध्ये कडवी झुंज आहे. आयसीसीने टीम इंडियाकडून या दोघांना नामांकन देण्यात आलंय. तर तिसरा खेळाडू हा न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनव्हे आहे. एका महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी 3 आयसीसी 3 खेळाडूंना पुरस्कारासाठी नामांकित करते. त्यानंतर या तिघांपैकी एकाची निवड केली जाते.
शुबमन गिल याने जानेवारी महिन्यात धमाकेदार कामगिरी केली. तर मोहम्मद सिराज याने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत निर्णायक भूमिका बजावत उल्लेखनयी कामगिरी केली.
गिलने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 धावा तर तिसऱ्या मॅचमध्ये 46 रन्स केल्या. त्यानंतर श्रीलंका विरुद्धच 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये अनुक्रमे 70, 21 आणि 116 अशा धावा केल्या.
तर यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये शुबमनने भीमपराक्रम केला. शुबमने द्विशतक ठोकलं. शुबमनने 149 बॉलमध्ये 208 धावांची खेळी केली. शुबमन यासह सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, इशान किशन याच्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पाचवा भारतीय ठरला. तसेच शुबमनने कमी वयात वनडे डबल सेंच्युरी ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही केला.
शुबमनने यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या पुढील 2 सामन्यांमध्ये अनुक्रमे 40 आणि 112 धावा केल्या. शुबमनने 3 सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्या विक्रमाची बरोबरी केली.
एकाबाजूला शुबमन गिल बॅटिंगने धमाका करत होता. तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराज प्रतिस्पर्धी संघाला धक्के देत होता. सिराजने जोरदार कामगिरी करत टीम इंडियाल जसप्रीत बुमराह याची उणीव भासू दिली नाही.
सिराजने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या वनडेत 30 रन्स देत 30 धावा केल्या. सिराजने यानंतर पुढील सामन्यांमध्ये अनुक्रमे 3 आणि 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता आयसीसी सिराज किंवा शुबमन या दोघांपैकी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देते, की या दोघांना वरचढ ठरत डेव्हॉन कॉनवे बाजी मारतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.