नवी दिल्ली | बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वर्ल्ड कप सामन्यात पहिल्यांदाच अशी घटना घडला आहे. क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही झालंय. श्रीलंका टीमचा फलंदाज अँजलो मॅथ्यूज याला टाईम आऊट घोषित करण्यात आलं. क्रिकेट इतिहासात आतापर्यंत अशा पद्धतीने कोणत्याही फलंदाजाला आऊट देण्यात आलं नाही. पंचांनी बाद घोषित केल्यानंतर मॅथ्यूजला मैदानाबाहेर जावं लागलं. या सर्व प्रकारानंतर बांगलादेश आणि कॅप्टन शाकिबने हे चुकीचं केलं असं म्हटलं जातंय. तसेच हे खिळाडूवृत्तीला धरुन नसल्याचंही म्हटलंय जातंय. नक्की काय घडलं आणि या टाईम आऊट बाबत आयसीसीचे नियम काय, हे आपण जाणून घेऊयात.
40.1.1 नियमानुसार, विकेट गेल्यानंतर तसेच फलंदाज रिटायर्ड झाल्यानंतर दुसऱ्या बॅट्समनने पुढील तिसऱ्या मिनिटापर्यंत मैदानात येऊन बॅटिंगसाठी तयार असायला हवा. असं न झाल्यास त्या फलंदाजाला आऊट देण्यात येतं. या नियमालाच ‘टाईम आऊट’ असं म्हणतात.
तसेच 40.1.2 या नियमानुसार, संबंधित फलंदाज 3 मिनिटांमध्ये बॅटिंगसाठी मैदानात न आल्यास अंपायर 16.3 नुसार योग्य कारवाई करु शकतात. अंपायर वरील नियमानुसार योग्य कारवाई करु शकतात.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.