आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी सेमी फायनलसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, टीम इंडियानंतर आता अफगाणिस्तानने सेमी फायनलचं तिकीट मिळवलं आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सेमी फायनलमधील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. तर पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगणार आहे. अशात सेमी फायनलचे काही नियम आपण जाणून घेऊयात. आतापर्यंत साखळी आणि सुपर 8 फेरीसाठी नियम वेगळे होते. मात्र आता सेमी फायनलचे नियम वेगळे असणार आहेत. हे नियम टीम इंडियासाठी फायदेशीर आहेत की नाही? हे समजून घेऊयात.
दोन्ही सेमी फायनल सामने 27 जून रोजी होणार आहेत. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना होणार आहे.तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भिडणार आहे. पहिल्या सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद आहे. मात्र दुसऱ्या सेमी फायनलसाठी राखीव दिवस नाही. दुसऱ्या सामन्यासाठी फक्त 250 मिनिटं राखीव ठेवण्यात आली आहेत.
तसेच साखळी आणि सुपर 8 फेरीतील सामन्याचा निकाल 5 षटकांचा खेळ झाला असल्यास डीएलएनुसार लावला जातो. अर्थात दोन्ही संघांनी 5 ओव्हरपेक्षा कमी खेळ झाला असल्यास सामना रद्द करण्यात येतो. मात्र दोन्ही संघ 5-5 ओव्हरपेक्षा जास्त खेळले असेल, तर सामन्याचा निकाल लावला जातो. मात्र सेमी फायनलमध्ये ही अट 5ने वाढवून 10 ओव्हर इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे जोवर दोन्ही संघ किमान 10 ओव्हर खेळत नाही, तोवर निकाल लावता येणार नाही.
टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले आणि मार्क वुड.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.