क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी यजमान अमेरिकाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यूएसएने मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर राखीव म्हणून तिघांना संधी दिली आहे. मोनांक पटेल यूएसएचं नेतृत्व करणार आहे. तर न्यूझीलंडचा माजी खेळाडू कोरी एंडरसन याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तर भारत सोडून अमेरिकेसाठी क्रिकेट खेळणाऱ्या उन्मुक्त चंद याला मोठा झटका लागला आहे. उन्मुक्त चंद याची टी 20 वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आलेली नाही. तर जन्माने मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रवाळकर याचाही समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा माजी अनुभवी खेळाडू कॉरी एंडरसन याला स्थान देण्यात आलं आहे. न्यूझीलंड आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2015 ची उपविजेता ठरली होती. कोरी त्या उपविजेत्या संघाचा सदस्य होता. एंडरसनला 13 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 33 टी 20 सामन्यांचा अनुभव आहे. एंडरसन बॅटिंग ऑलराउंडर आहे. त्यामुळे यूएसएला त्याच्या अनुभवाचा मोठ्या स्पर्धेत चांगला फायदा होऊ शकतो.
आयसीसीच्या या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 4 ग्रुपमध्ये 5-5 नुसार विभागण्यात आलयं. त्यानुसार टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या गटात, अमेरिका, आयर्लंड, पाकिस्तान आणि कॅनेडाचा समावेश आहे. टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यात 12 जून रोजी सामना होणार आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचा यूएस विरुद्धचा साखळी फेरीतील तिसरा सामना असणार आहे. हा सामना न्यूयॉर्क येथे होणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी यूएसए टीम
It’s almost time to defend our home turf in the @T20WorldCup! Here is our 15-player squad that will be representing the United States in the World Cup beginning on June 1!#WeAreUSACricket #T20WorldCup #TeamUSA #Cricket pic.twitter.com/phnzT2Ce48
— USA Cricket (@usacricket) May 3, 2024
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी यूएसए टीम : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उप-कर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर, शॅडली व्हॅन शाल्कविक , स्टीव्हन टेलर आणि शायन जहांगीर.
राखीव खेळाडू : गजानंद सिंग, जुआनोय ड्रायस्डेल आणि यासिर मोहम्मद.