VIDEO : विश्वचषकापूर्वी मोठी अपडेट, सामन्यापूर्वी होणार हे काम, जाणून घ्या….

| Updated on: Sep 13, 2022 | 10:30 PM

टी-20 विश्वचषकापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती अपडेट नेमकी काय आहे, ते जाणून घ्या....

VIDEO : विश्वचषकापूर्वी मोठी अपडेट, सामन्यापूर्वी होणार हे काम, जाणून घ्या....
टीम इंडिया
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित असलेल्या  टी-20 विश्वचषकासाठी (icc T20 world cup) टीम इंडियाची (Team India)) नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुम्ही म्हणाल विश्वचषकापूर्वी इतक्या सगळ्या घडामोडी कशा घडता आहेत, अचानक बीसीसीआयचं (BCCI) टेन्शन वाढलं, काही खेळाडू नाराजही झाले आहेत. मात्र, हे सगलं होत असताना एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती माहिती नेमकी काय आहे, ते जाणून घ्या…

बीसीसीआयनं टीम इंडियाची नवी जर्सी लॉच करणार आहे. बोर्ड आपल्या चाहत्यांना टीम इंडियाच्या या नव्या जर्सीचा भाग बनण्याची संधी दिली आहे. बीसीसीआयनं आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्यांनी नवीन जर्सीबद्दल माहिती दिली आहे.

कशी असणार नवी जर्शी?

बीसीसीआय ही जर्सी कधी लाँच करणार याची माहिती त्यांनी दिलेली नाही. मात्र टीम इंडियाची नवी जर्सी येणार असल्याचे त्यांनी निश्चितपणे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे तीन खेळाडू दिसत आहेत. कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या या व्हिडिओमध्ये आहेत. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, “तुमच्या प्रोत्साहनाशिवाय खेळ जसा आहे तसा झाला नसता. तुमचा चाहता क्षण शेअर करून तुमची आवड दाखवा.

ही पोस्ट पाहा…

या व्हिडिओच्या सुरुवातीला पहिला कर्णधार रोहित शर्मा येतो. तो म्हणतो, ‘चाहता म्हणून तुम्ही आम्हाला क्रिकेटर बनवले आहे.’ मग श्रेयस अय्यर येतो आणि म्हणतो, ‘तुमच्या प्रोत्साहनाशिवाय खेळ जसा आहे तसा होणार नाही.’ व्हिडिओच्या शेवटी, हार्दिक पांड्या येतो आणि तो सांगतो की टीम इंडियाची नवीन जर्सी येणार आहे. पांड्या म्हणतो, ‘लिंकवर क्लिक करा आणि टीम इंडियाच्या नवीन जर्सीचा एक भाग व्हा.’

हेही वाचा…..

  1. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषकाची पहिली मालिका जिंकली. त्यानंतर संघ पुन्हा कधीही विजेतेपद जिंकू शकला नाही.
  2. 2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने फायनलमध्ये नक्कीच पाऊल टाकले होते पण जेतेपदापासून दूरच राहिले.
  3. रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत कर्णधारपद भूषवणार असून त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक होती आणि संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. या विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले आणि कोणत्याही प्रकारच्या विश्वचषकातील पाकिस्तानकडून भारताचा हा पहिलाच पराभव ठरला.