आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अर्थात 2 जून रोजी यजमान यूएसए आणि वेस्ट इंडिय या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली आहे. यूएसएने कॅनडावर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. तर विंडिजने जरी 5 विकेट्सने विजय मिळवला असला तरी नवख्या पापुआ न्यू गिनी टीमने जोरदार झुंज दिली. पापुआ न्यू गिनीने पहिले बॅटिंग करत विंडिजसमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं. विंडिजला हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 19 ओव्हरपर्यंत वाट पाहावी लागली. आंद्रे रसेल आणि रोस्टन चेस या दोघांनी निर्णायक क्षणी फटकेबाजी केल्याने विंडिजला 5 विकेट गमावून आणि 6 बॉल राखून विजय मिळवता आला. विंडिजने अशाप्रकारने विजयी सुरुवात केली.
विंडिजसाठी रोस्टन चेस याने सर्वाधिक 42 धावांची नाबाद खेळी केली. चेसने 27 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 42 धावा केल्या. तर आंद्रे रसेल याने 9 बॉलमध्ये नॉट आऊट 15 धावांचं योगदान दिलं. तर त्याआधी निकोलस पूरन याने 27 आणि कॅप्टन रोवमन पॉवेल याने 15 धावा जोडल्या. तर ओपनर ब्रँडन किंग याने 34 रन्स केल्या. शेरफेन रुदर्रफोड 2 धावा करुन माघारी परतला. तर जॉन्सन चार्ल्स याला भोपळाही फोडता आला नाही. पीएनकडून कॅप्टन असद वाला याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
त्याआधी विंडिजने टॉस जिंकून पीएनजीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पीएनजीने 20 ओव्हरमध्ये 8 बाद 136 धावा केल्या. पीएनजीकडून सेसे बाऊ याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. सेसे बाऊ याच्या खेळीत 1 सिक्स आणि 6 चौकारांचा समावेश होता. किपलिन डोरिगा याने 27, असद वाला 21, चार्ल्स अमिनी 12 आणि चाद सोपर याने 10 धावांचं योगदान दिलं. पीएनजीकडून या 5 जणांचा अपवाद वगळता इतर एकालाही जुहेरी आकडा गाठता आला नाही. विंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि आंद्रे रसेल या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एकेल होसैन, रोमरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोतीये या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
विंडिजची विजयी सुरुवात
West Indies overcome early jitters to register win against PNG in their opening #T20WorldCup clash 👊#WIvPNG | Match report 👇https://t.co/b8qfhj9sIl
— ICC (@ICC) June 2, 2024
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), जॉन्सन चार्ल्स, ब्रँडन किंग, रोस्टन चेस, निकोलस पूरन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोती.
पापुआ न्यू गिनी प्लेईंग ईलेव्हन : असद वाला (कर्णधार), टोनी उरा, सेसे बाऊ, लेगा सियाका, हिरी हिरी, चार्ल्स अमिनी, किपलिन डोरिगा (विकेटकीपर), अले नाओ, चाड सोपर, काबुआ मोरिया आणि जॉन कारीको.