आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी20i रँकिग जाहीर केली आहे. आयसीसी टीम इंडियाच्या झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेनंतर ही रँकिंग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा बॅट्समन सूर्यकुमार यादव याला या रँकिंमध्ये अव्वल स्थानी झेप घेता आली नाही. मात्र इंग्लंडचा ओपनर बॅट्समन फिल सॉल्ट सूर्यकुमारजवळ येऊन पोहचला आहे. तर दुसऱ्या बाजूला यशस्वी जयस्वाल याला झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेतील कामगिरीचा फायदा झाला आहे. यशस्वीने या रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.
आयसीसीच्या टी 20 बॅट्समन रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा विस्फोटर फलंदाज ट्रेव्हिस हेड हा अव्वल स्थानी आहे. हेडचे रेटिंग्स पॉइंट्स हे 844 इतके आहेत. हेड गेल्या काही आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. हेडने आताही हे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. तर सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी आहे. मात्र सूर्याचं स्थान धोक्यात आहे. सूर्याचे रेटिंग्स पॉइंट्स हे 797 इतके आहे. सूर्या इतकेच रेटिंग्स पॉइंट्स हे इंग्लंडंच्या फिलीप सॉल्टच्या नावे आहेत. त्यामुळे सूर्या-सॉल्ट संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे सूर्याचं दुसरं स्थान धोक्यात आहे.
सूर्यकुमार यादव याला निवड समितीने टी 20 वर्ल्ड कपनंतर झिंबाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे सूर्याला झिंबाब्वे विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 सामन्यांपासून दूर रहावं लागलं होतं. त्याचाच फटका हा सूर्याला टी 20 रँकिंगमध्ये बसला आहे. मात्र आता सूर्यकुमार श्रीलंका दौऱ्यात खेळणार आहे. त्यामुळे सूर्याला श्रीलंके विरूद्धच्या टी 20 मालिकेतून रँकिगमध्ये सुधारण्याची संधी आहे. सूर्याकडे दुसरं स्थान मजबूत करण्यासह अव्वल स्थानाकडे झेप घेण्याची दुहेरी संधी आहे.
यशस्वी भव:
India players rise in the latest ICC Men’s Player Rankings after T20I series win in Zimbabwe 📈 https://t.co/cgUD1BKQp7
— ICC (@ICC) July 17, 2024
ट्रेव्हिस हेड आणि सूर्यकुमार-सॉल्टनंतर पाकिस्तानचा बाबर आझम हा चौथ्या स्थानी आहे. तर मोहम्मद रिझवान हा पाचव्या स्थानी आहे. यांच्या रँकिंमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. यशस्वीला तब्बल 4 स्थानाची झेप घेतली आहे. त्यामुळे यशस्वी 10 व्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी पोहचला आहे. यशस्वीच्या नावावर 743 रेटिंग्स आहेत.