ऑस्ट्रेलियाने आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून 5 जणींनी दुहेरी आकडा गाठला. मात्र भारतीय गोलंदाजांनी एकीलाही मोठी खेळी करु दिली नाही. टीम इंडियाने या स्पर्धेतील 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील शेवटचा आणि करो या मरो असा सामना आहे. त्यामुळे विजय आवश्यक आहे. अशात आता टीम इंडियाच्या गोलंदाजांनंतर भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. आता भारतीय फलंदाज या कांगारुंच्या बॉलिंगचा कसा सामना करतात? याकडे साऱ्यांच लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ग्रेस हॅरीस हीने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. कॅप्टन ताहिला मॅग्राथ आणि एलिसा पेरी या दोघींनी प्रत्येकी 32-32 धावांचं योगदान दिलं. फोबी लिचफील्ड हीने नाबाद 15 आणि ॲनाबेल सदरलँडने 10 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना भारतीय गोलंदाजांनी झटपट गुंडाळून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भारताकडून रेणूका सिंह आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर श्रेयांका पाटील, पूजा वस्त्राकार आणि राधा यादव या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
भारतासमोर 152 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
An absorbing first innings in Sharjah at the Women’s #T20WorldCup 😯
Who will emerge winners? 🇦🇺🇮🇳#WhateverItTakes | #INDvAUS 📝: https://t.co/7MvwQMCG1w pic.twitter.com/Aq8gwQ7mpC
— ICC (@ICC) October 13, 2024
ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ताहिला मॅकग्रा (कॅप्टन), बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि डार्सी ब्राउन.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.