आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. ऑस्ट्रेलियाने याआधीचे तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. तर टीम इंडियाने पहिला सामना गमावल्यानंतर सलग 2 विजय मिळवले. त्यामुळे टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवावा लागणार आहे. उभयसंघातील या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली. या सामन्यात एलिसा हीली हीच्या अनुपस्थितीत ताहिला मॅक्ग्रा नेतृत्व करत आहे. एलिसाला दुखापत झाल्याने ताहिलाकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ताहिलाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 2 बदल केले आहेत. तर भारतीय संघात कर्णधार हरमनप्रीत कौर हीने एक बदल केला आहे. प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळाली हे जाणून घेऊयात.
नियमित कर्णधार एलिसा हीली पूर्णपणे फिट नसल्याने ती या सामन्यातून बाहेर पडली आहे. या व्यतिरिक्त टायला व्लामिनक आधीच स्पर्धेतून बाहेर पडली आहे. अशात या दोघांच्या जागी संघात ग्रेस हॅरीस आणि डार्सी ब्राऊन या दोघींचा समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडिया पूजा वस्त्राकार हीला एस सजना हीच्या जागी संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss, #TeamIndia will be bowling first in Sharjah
Follow the match ▶️ https://t.co/Nbe57MXNuQ#T20WorldCup | #INDvAUS | #WomenInBlue pic.twitter.com/d2OGNzrlEw
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2024
ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ताहिला मॅकग्रा (कॅप्टन), बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि डार्सी ब्राउन.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.