ऋषभ पंत याने अपघातानंतर तब्बल 18 महिन्यांनी टीम इंडियात तडाखेदार कमबॅक केलं आहे. ऋषभ पंतने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या अखेरचा आणि टीम इंडियाच्या एकमेव सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध झंझावाती फलंदाजी करत आपण मुख्य स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. ऋषभ पंतने बांगलागेश विरुद्ध प्रॅक्टीस मॅचमध्ये विस्फोटक अर्धशतक ठोकलं आहे. पंतच्या अर्धशतकासह टीम इंडियाच शतकही पूर्ण झालं. ऋषभ पंतने चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. ऋषभ त्यानंतर रिटायर्ड आऊट होत मैदानाबाहेर गेला. पंतच्या या खेळीमुळे टीम इंडियाला बांगलादेशवर पकड मिळवता आली.
ऋषभ पंतने अखेरचा टी 20 सामना हा 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर पंतचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाला. पंतने यातून सावरुन आयपीएलच्या 17 व्या मोसमातून कमबॅक केलं. त्यानंतर आता पंतने टीम इंडियासाठी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य सामन्याआधी प्रॅक्टीस मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं. पंतने टीम इंडियाच्या डावातील 12 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून अर्धशतक झळकावलं. त्यासह टीम इंडियाच्या 100 धावाही पूर्ण झाल्या. ऋषभ अर्धशतक ठोकल्यानंतर तो 53 धावांवर रिटायर्ड आऊट होत बाहेर गेला.
ऋषभ पंतने 32 बॉलमध्ये 4 खणखणीत चौकार- 4 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने आणि 165.62 च्या स्ट्राईक रेटने 32 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली. ऋषभ पंतच्या या खेळीसाठी त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. दरम्यान आता टीम इंडिया 20 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत मजल मारते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऋषभ पंतची फटकेबाजी
Spidey weaving his web! 🕸️#RishabhPant takes the attack to Bangladesh with a flurry of huge sixes! 🔥
📺 | #BANvIND | LIVE NOW | #T20WorldCupOnStar (Only available in India) pic.twitter.com/79iEgU118K
— Star Sports (@StarSportsIndia) June 1, 2024
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
बांगलादेश प्लेईंग टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), सौम्या सरकार, तौहीद ह्रदोय, साकिब अल हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकिब आणि तन्वीर इस्लाम.