आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होत आहे. त्याआधी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सराव सामन्यातील अखेरच्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. तर नजमुल हुसेन शांतो बांगलादेशची कॅप्टन्सी करणार आहे. सामन्याचं आयोजन हे न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रोहित शर्मा याने एका क्षणाचाही विचार न करता बॅटिंगचा निर्णय घेतला.
बांगलादेश विरुद्धच्या या सराव सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली खेळणार नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस दरम्यान रोहित खेळणार नसल्याचं म्हटलं. विराट अमेरिकेत 31 मे रोजी अमेरिकेत पोहचल्याने बांगलादेश विरुद्ध खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना विराट कोहलीला मैदानात पाहण्यासाठी 5 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा आयर्लंड विरुद्ध 5 जून रोजी खेळणार आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 टी 20 सामन्यांमध्ये आमनासामना झाला आहे. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला एकदा विजयी होण्यात यश आलंय.
टीम इंडियाने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨#TeamIndia win the toss and elect to bat in the warm-up match against Bangladesh.
Follow the Match ▶️ https://t.co/ivHxoCo2gt#T20WorldCup pic.twitter.com/slTc7Q7QBR
— BCCI (@BCCI) June 1, 2024
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), जाकेर अली (विकेटकीपर), लिटॉन दास, सौम्य सरकार, तॉहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकी आणि तन्वीर इस्लाम.