आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 20 संघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. मुख्य स्पर्धेआधी 27 मे पासून सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. टीम इंडिया आपला एकमेव सराव सामना हा 1 जून रोजी बांगलदेश विरुद्ध खेळणार आहे. तर टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध रोहित शर्मा याच्या नेतृत्वात करणार आहे. त्यानंतर टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना खेळणार ज्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी महामुकाबला होणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये बेस्ट प्लेईंग ईलेव्हन कशी असेल? जाणून घेऊयात.
कॅप्टन रोहित शर्मा याच्यासह विराट कोहली ओपनिंग करु शकतो. विराटने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आरसीबीसाठी काही सामन्यांमध्ये ओपनिंग केली होती. विराटने या हंगामातील 15 सामन्यांमध्ये 741 धावा केल्या. विराटने 5 अर्धशतकं आणि 1 अर्धशतक ठोकलं. विराट ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. अशात विराटच्या या कामगिरीची फायदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये होऊ शकतो आणि व्हावा अशी क्रिकेट चाहत्यांची आशा आहे.
तिसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादवला संधी मिळू शतचे. त्यामुळे सूर्यावर मोठी जबाबदारी असेल. चौथ्या स्थानी विकेटकीपर बॅट्समनला खेळवता येईल. आता संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोघांपैकी ज्याला संधी मिळेल, तो चौथ्या स्थानी येऊ शकतो. टीम मॅनेजमेंट या दोघांपैकी विकेटकीपर म्हणून कुणावर विश्वास दाखवणार हे तेव्हाच समजेल. तर पाचव्या स्थानी विस्फोटक फलंदाज शिवम दुबे याला संधी दिली जाऊ शकते. शिवमवर टीम इंडियाला जोरदार फिनिशिंग टचची अपेक्षा असणार आहे. शिवमने आयपीएल 17 व्या हंगामात 396 धावा केल्या.
त्यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या या दोघांवर जबाबदारी असणार आहे.मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरल्यास या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोघांकडून प्रतिस्पर्ध्यांना फिरकीच्या जाळ्यात फसवण्याची ताकद आहे. त्यामुळे या दोघांकडून मोठ्या आशा आहेत. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांवर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.