K L Rahul | केएल राहुल याला आयसीसीकडून मोठा दणका, नक्की काय झालं?

| Updated on: Feb 22, 2023 | 4:44 PM

टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन केएल राहुल हा गेल्या अनेक दिवसांपासून खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर ट्रोल होतोय. आता केएल याला आयसीसीने मोठा दणका दिला आहे.

K L Rahul | केएल राहुल याला आयसीसीकडून मोठा दणका, नक्की काय झालं?
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल हा सोशल मीडियावर वाईट कामगिरीमुळे ट्रोल होतोय. केएल याला धावा काढण्यासाठी संघर्ष करायला लागतोय. केएल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे केएलवर नेटकरी संतापलेत. सातत्याने अपयशी ठरुनही टीम मॅनेजमेंट केएल याला का खेळवतेय, असा संतप्त सवाल हा नेटकरी विचारत आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे 2 माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्याच केएलवरुन ट्विटयुद्ध सुरु आहे. केएलमुळे भारतीय क्रिकेट विश्वात नकारात्मक वातावरण आहे. सोशल मीडियावर नेटीझन्स संतापलेत. त्यात आता आयसीसीनेही केएलला मोठा दणका दिला आहे.

आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी केली आहे. यामध्ये केएल याला मोठं नुकसान झालं आहे. केएल याची एकूण 7 स्थानाने घसरण झाली आहे. केएल फलंदाजांच्या क्रमवारीत 58 व्या स्थानी घसरलाय. केएलच्या नावावर 493 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

केएल कांगारु विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींमध्ये अपयशी ठरला. त्याला धावा करता आल्या नाहीत. याचा फटका केएलला बसला आहे. निराशाजनक कामगिरीनंतरही केएलची उर्वरित 2 सामन्यांमध्ये केएलची निवड करण्यात आली. मात्र केएल आयसीसीच्या कचाट्यातून वाचू शकलेला नाही.

हे सुद्धा वाचा

केएल या रँकिगआधी 51 व्या क्रमांकावर होता. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्लॉप कामगिरीमुळे तो 58 व्या स्थानावर येऊन पोहचला आहे.

टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन हा 781 रेटिंग्ससह 6 व्या स्थानी कायम आहे. तर त्या खालोखाल अर्थात 7 व्या स्थानी कॅप्टन रोहित शर्मा आहे. रोहितच्या नावावर 777 रेटिंग्स आहेत. टीम इंडियाचे टॉप 10 मध्ये हे दोघेच बॅटर आहेत.

तर टेस्ट ऑलराउंडर्सच्या रँकिगमध्ये टीम इंडयाचा वरचष्मा आहे. पहिल्या पाचात टीम इंडियाचे 3 ऑलराउंडर्स आहेत. यामध्ये रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल हे तिघे आहेत. जडेजा आणि अश्विन या दोघांनी आपलं स्थान कायम राखलंय. तर अक्षरने 2 स्थानांची झेप घेत 5 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

दरम्यान टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्ऱॉफीत 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

उर्वरित कसोटी मालिकेचं वेळापत्रक

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर

चौथी कसोटी, 9-13 मार्च,

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.