मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हलमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्यात येणार आहे. त्याआधीच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत एक नंबर कामगिरी केली आहे. आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडिया या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला पछाडत अव्वल स्थानी पोहचली आहे. ऑस्ट्रेलिया या रँकिंगमध्ये गेल्या सव्वा वर्षांपासून पहिल्या स्थानी होती. मात्र टीम इंडियाने कांगारुंकडून सिंहासन हिसकावलं.
टीम इंडिया आता कसोटी क्रमवारीत 121 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाची 116 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी फेकली गेली आहे. इंग्लंड 114 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि न्यूझीलंड पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तान सहाव्या, श्रीलंका सातव्या, विंडिज आठव्या बांगलादेश नवव्या आणि झिंबाब्वे दहाव्या क्रमांकावर आहे.
टीम इंडिया नंबर 1
? New World No.1 ?
India dethrone Australia in the annual update of the @MRFWorldwide ICC Men's Test Rankings ahead of the #WTC23 Final ?
— ICC (@ICC) May 2, 2023
आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियानंतर कसोटी मालिका खेळली नाही. त्यामुळे असं मध्येच एकाएकी टीम इंडिया पहिल्या स्थानी कशी आली, असा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आसीसीने वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे.त्यासाठी मे 2020 ते मे 2022 हा कालावधी ग्राह्य धरण्यात आला होता. याआधारावर टीम इंडियाचे रेटिंग पॉइंट्स सर्वाधिक आहेत. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या स्थानी पोहचली.
दरम्यान टीम इंडिया कसोटीसह टी 20 क्रिकेटमध्येही अव्वल क्रमांकावर आहे. टीम इंडियाची रेटिंग 267 तर पॉइंट्स 13 हजार 889 इतके आहेत. या यादीत टीम इंडियानंतर इंग्लंड दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, पाकिस्तान चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान वनडे आणि कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी आल्याने टीम इंडियाचा विश्वास नक्कीच दुप्पटीने दुणावला आहे. टीम इंडियाला महिन्याभराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप फायनल खेळायची आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2021 साली न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी गमावली होती. मात्र यंदा दुसऱ्यांदा टीम इंडियाला ही संधी मिळाली आहे.तेव्हा विराट कोहली कॅप्टन होता. आता रोहित शर्मा आहे. त्यामुळे या आयसीसी रँकिंगमुळे टीम इंडियाचा नक्कीच कुठेतरी विश्वास वाढलेला आहे.
WTC Final साठी टीम इंडिया| रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.