टीम इंडियाची U19 World Cup 2024 मोहिम शनिवारपासून, पहिला सामना कोणासोबत?

| Updated on: Jan 19, 2024 | 5:42 PM

Icc u19 world cup 2024 Team India Schedule | टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2024 मधील मोहिमेला शनिवार 20 जानेवारीपासुन सुरुवात करणार आहे. टीम इंडिया साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे.

टीम इंडियाची  U19 World Cup 2024 मोहिम शनिवारपासून, पहिला सामना कोणासोबत?
Follow us on

केपटाऊन | क्रिकेट चाहत्यांना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, तो दिवस अखेर उजाडला आहे. आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला आज शुक्रवार 19 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. या अंडर 19 वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान हा दक्षिण आफ्रिकेकडे आहे. टीम इंडिया-पाकिस्तानसह या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघांना 4-4 हिशोबाने 4 गटात विभागण्यात आलं आहे. एकूण 24 दिवसात 41 सामने पार पडणार आहेत. टीम इंडिया गतविजेता आहे. टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 5 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे.

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही शनिवारी 20 जानेवारीपासून होत आहे. उदय सहारन याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. उदय 2022 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये राखीव खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. टीम इंडियात प्रतिभावान खेळाडू आहेत. यामध्ये सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान, बीडचा सचिन धस, सोलापूरचा अर्शिन कुलकर्णी यांचा समावेश आहे. हे खेळाडू एकहाती सामना पालटण्याची क्षमता आहे.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड आणि यूएसचा समावेश आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 20 जानेवारी रोजी मॅनगॉंग ओव्हल ब्लूमफॉन्टेन येथे होणार आहे. तर दुसरा सामना हा 25 जानेवारी रोजी आयर्लंड विरुद्ध होईल. तसेच टीम इंडियाचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा यूएस विरुद्ध 28 जानेवारी रोजी पार पडेल. टीम इंडियाचे तिन्ही सामने एकाच मैदानावर आणि एकाच वेळी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

टीम इंडिया सर्वात यशस्वी

अंडर 19 वर्ल्ड कप इतिहासात टीम इंडिया सर्वात यशस्वी आहे. टीम इंडियाने एकूण 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा मोहम्मद कैफ याच्या नेतृत्वात हा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाने 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.

टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कपसाठी सज्ज

अंडर 19 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरवेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी।