आयसीसी वूमन्स टी20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 14 व्या सामन्यात अ गटातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन एलिसा हिली हीने फिल्डिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. पाकिस्तानने 2 पैकी 1 सामना जिंकला तर 1 गमावला आहे. अशात पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे फलंदाज ऑस्ट्रेलियाला किती धावांचं आव्हान देतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
“आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ही एक नवीन विकेट आहे, परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. पुढे काय उलगडते ते बघायला हवे. आम्ही खेळ पाहिले आहेत, या विकेटमध्ये थोडी फिरकी आहे”, असं ऑस्ट्रेलियाची कर्णधार हिली नाणेफेक जिंकल्यानंतर म्हणाली.
पाकिस्तानची नियमित कर्णधार फातिमा सना हीच्या वडिलांचं निधन झाल्याने ती मायदेशी परतली आहे. त्यामुळे फातिमा सना हीच्या अनुपस्थितीत मुनीबा अली पाकिस्तानचं नेतृत्व करत आहे. पाकिस्तानची कर्णधार मुनीबा अली म्हणाली की, या सामन्यासाठी उत्सुक आहे. फातिमा सानासाठी ही दु:खद बातमी आहे, पण या गोष्टी आमच्या नियंत्रणात नाहीत. आम्ही तिला मिस करू. आमच्या संघात काही बदल आहेत. आम्हाला आमचा गेम खेळायचा आहे आणि चांगली धावसंख्या उभारायची आहे.
ऑस्ट्रेलिया टॉसचा बॉस
📸©️🪙#PAKWvAUSW | #T20WorldCup | #BackOurGirls pic.twitter.com/VwDyjqAHp4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 11, 2024
पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मुनीबा अली (कर्णधार आणि विकेटकीपर), सिद्रा अमीन, निदा दार, सदफ शमास, आलिया रियाझ, इरम जावेद, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल आणि सय्यदा अरूब शाह.
ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), बेथ मूनी, एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि टायला व्लामिंक.