मुंबई | वूमन्स टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामन्यात पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवत 7 व्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 167 धावाच करता आल्या.दरम्यान या सामन्यात हरमनप्रीत रनआऊट झाल्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांना महेंद्रसिंह धोनी याची आठवण आली.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. शफाली वर्मा या सामन्यात अपयशी ठरली. 9 या धावसंख्येवर आता पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मंधाना देखील अवघ्या दोन धावा करून बाद झाली. त्यानंतर यास्तिका भाटिका धावचीत झाल्याने तिच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला.
त्यानंतर चौथ्या गड्यासाठी जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरनं डाव सावरला. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स चुकीचा फटका 43 या धावसंख्येवर परतली. त्यानंतर हरमनप्रीत कौरची खेळी सुरुच होती. पण धावचीत झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा मावळल्या.
दीप्ती शर्मानं डाव सावरला खरा पण तिलाही स्नेह राण , राधा यादव यांची साथ मिळाली नाही. अखेर हा सामना भारताने 5 धावांनी गमावला.
टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानात होती, तोवर टीम इंडियाच्या विजयाची आशा कायम होती. मात्र हरमनप्रीत 15 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रनआऊट झाली.हरमनप्रीतने धाव पूर्णच केली होती, पण हरमनप्रीतची बॅट क्रीजच्या बाहेर होती. या संधीचा फायदा घेत विकेटकीपर एलिसी हीलीने हरमनप्रीतला रनआऊट केलं.
दुर्देवीरित्या रनआऊट झाल्याने हरमनप्रीतचा संताप पाहायला मिळाला. हरमनने डगआऊटच्या दिशेने जाताना बॅट आपटली. तसेच हरमनप्रीत आऊट होताच क्रिकेट चाहत्यांना महेंद्रसिंह धोनी आठवला.
हरमनप्रीत कौर रनआऊट
India's No.7 taking India close in a semi-final of an ICC tournament and ending in a run-out… #HarmanpreetKaur #INDvsAUS #MSDhoni pic.twitter.com/MuHYyZOJN1
— CricTracker (@Cricketracker) February 23, 2023
धोनीही वनडे वर्ल्ड कप 2019 च्या सेमी फायनलमध्ये अशाच प्रकारे रनआऊट झाला होता. तेव्हाही टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगंल होतं. आता केपटाऊनमध्येही असंच काहीसं झालं.
INDvsAUS, Team India Playing 11 | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.
Australia Playing 11 | मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.