India vs Ireland : चक दे इंडिया! भारताच्या रणरागिनी जेतेपदापासून दोन पाऊल दूर

| Updated on: Feb 20, 2023 | 10:48 PM

टी -20 वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारतानं आयर्लंडवर 5 धावांंनी विजय मिळवला आहे.

India vs Ireland : चक दे इंडिया! भारताच्या रणरागिनी जेतेपदापासून दोन पाऊल दूर
team india
Follow us on

केपटाऊन : टी -20 वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारतानं आयर्लंडवर 5 धावांंनी विजय मिळवला आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं आहे. या विजयासह भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यामध्ये भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.

भारतीय संघाने दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. एमी हंटर पहिल्याच चेंडूवर बाद झाली. त्याच षटकामध्ये रेणूकी सिंहने ओरला प्रेंडरगास्टा बोल्ड आऊट केलं. मात्र त्यानंतर आपल्या हाती पवित्रा घेत दोघींनी भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरू केली होती. सलामीवीर गॅबी लुईस 32 नाबाद धावा आणि लॉरा डेलेनीने नाबाद 17 धावा केल्या. पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवला गेला. काही वेळाने डकवर्थ-लुईसनुसार भारताला 5 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. या विजयासह भारताने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

भारताकडून सलामीला शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र शफाली वर्मा डेलनीच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारून बाद झाली. तिने 29 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानानं डाव सावरला. त्यानंतर हरमनप्रीत कौर 13 धावा करून तंबूत परतली.

ती येत नाही तोच रोचा घोष मैदानात हजेरी लावून तंबूत हजर झाली. तिला आपलं खातही खोलता आलं नाही. त्यानंतर जेमिमानं स्मृतीसोबत चांगली खेळी केली. स्मृती मंधानाने 56 चेंडूत 87 धावा केल्या आणि बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्मा आली खरी पण भोपळाही फोडू शकली नाही. आयर्लंडकडून लॉरा डेलनीने 3, ओरला प्रेन्डरगास्टनं 2 आणि अरलेन केलीनं 1 विकेट घेतली.

आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटिल, लॉरा डेलेनी (कर्णधार), आर्लेन केली, मेरी वॉल्ड्रॉन (कीपर), लेआ पॉल, कारा मरे, जॉर्जिना डेम्पसी

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (कीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग