न्यूलँड्स | भारतीय महिला क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान चा 7 विकेट्सने पराभव केला आहे. टीम इंडियाने या विजायसह आशिया कपमधील पराभवाचा वचपा घेतला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष या जोडीने टीम इंडियाला विजयी केलं.
जेमिमाह आणि रिचा या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी आणि तितकीच निर्णायक भागीदारी केली. या दोघींनी केलेल्या फटकेबाजीच्या आगीत पाकिस्तान टीम खाक झाली. या दोघींनी मैदानात चौफेर फटेकबाजी केली. या दोघींमुळे रंगतदार होत असलेला सामना एकतर्फी झाला.
टीम इंडियाला कर्णधार हरमनप्रीत कौरच्यारुपात तिसरा धक्का बसला. तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 3 बाद 93 होता. मात्र रिचाने मैदानात येताच धडाका लावला. तिने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रिचाने 18 व्या ओव्हरमध्ये सलग 3 चौकार ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलं.
A stirring run-chase from India in Cape Town as they start their #T20WorldCup campaign with a win over Pakistan ?
Match report ?#INDvPAK | #TurnItUp
— ICC (@ICC) February 12, 2023
तर जेमिमाहने चौकार मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तसेच तिने अर्धशतक पूर्ण केलं. रिचाने 20 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या. यामध्ये 5 खणखणीत चौकारांचा समावेश होता. तर जेमिमाहने38 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या.
जेमिमाहने केलेल्या अर्धशतकी खेळीसाठी तिला ‘मॅन ऑफ द मॅच’या पुरस्कारानै गौरवण्यात आलं. तसेच टीम इंडियाने या विजयासह आपल्या खात्यात 2 पॉइंट्स जोडले आहेत. टीम इंडिया बी ग्रुपच्या पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे.
दरम्यान टीम इंडियाचा वर्ल्ड कप मोहिमेतील दुसरा सामना हा विंडिज विरुद्ध होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देयोल, रिचा घोष (विकेटकीपर),दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, आणि रेणुका ठाकूर सिंह.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन – बिस्माह मारूफ (कप्तान), जावेरिया खान, मुनीब अली (विकेटकीपर), निदा दार, सिदरा अमीन, आलिया रियाज, आयसा नसीम, फातिमा सना, ऐमान अनवर, नाश्रा संधू आणि सादिया इकबाल.