AUS vs NZ Toss: ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Oct 08, 2024 | 7:39 PM

Australia Women vs New Zealand Women Toss : ऑस्ट्रेलियाने वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध नाणेफेक जिंकली आहे.

AUS vs NZ Toss: ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
womens australia vs womens new zealand
Image Credit source: Icc X account
Follow us on

आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे शाहजाह क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सुरुवात केलीय. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून सेमी फायनलचा दावा आणखी मजबूत करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. एलिसा हीली हीच्याकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व आहे. तर सोफी डिव्हाईन न्यूझीलंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन एलिसा हीने बॅटिंगचा निर्णय केला आहे.

दोन्ही संघात बदल, कुणाला संधी?

दोन्ही संघांनी या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये केले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने प्रत्येकी 1 बदल केला आहे. न्यूझीलंडने जेस केरच्या जागी फ्रॅन जोनास हीचा समावेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने ग्रेस हॅरिस हीला डार्सी ब्राउनच्या जागी संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंड नंबर 1

दरम्यान ए ग्रुपपैकी न्यूझीलंड पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट हा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत सरस असल्याने ते पहिल्या स्थानी आहेत. न्यूझीलंडने टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात 58 धावांनी पराभव केला होता. न्यूझीलंडने मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने त्यांना नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झाला आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +2.900 इतका आहे. तर ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट +1.908 असा आहे.

ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, जॉर्जिया वेअरहॅम, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, ग्रेस हॅरिस, सोफी मोलिनक्स आणि मेगन शूट.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डिव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), रोझमेरी मायर, फ्रॅन जोनास, ली ताहुहू आणि ईडन कार्सन.