आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत रविवारी 6 ऑक्टोबरला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. दिवसातील दुसऱ्या आणि एकूण आठव्या सामन्यात बी ग्रुपमधील विंडिज विरुद्ध स्कॉटलँड अशी लढत होणार आहे. तर सातवा सामना हा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सातव्या सामन्यात पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. पाकिस्तानने स्पर्धेत श्रीलंकेला पराभूत करत विजयी सुरुवात केली आहे. तर टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना आव्हानात्मक असणार आहे.
हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर फातिमा सना हीच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतासाठी हा आरपारचा सामना असणार आहे. तसेच पाकिस्तान विरुद्धचा सामना असल्याने नक्कीच भारतावर थोडफार का होईना पण दडपण असेल. उभयसंघातील हा सामना कुठे होणार? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
इंडिया-पाकिस्तान सामना रविवारी 6 ऑक्टोबरला होणार आहे.
इंडिया-पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
इंडिया-पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
इंडिया-पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर हॉटस्टार या एपवर सामन्याचा आनंद घेता येईल.
वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमीमा रोड्रिक्स, रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह, डी हेमलता, आशा सोभाना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजीवन सजना.
पाकिस्तान वूमन्स टीम : फातिमा सना (कॅप्टन), मुनेबा अली (विकेटकीपर), गुल फिरोझा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, तूबा हसन, सदाफ शमास, नशरा संधू, डायना बाइग, इराम जावेद, ओमाइमा सोहेल, सय्यदा अरूब शाह आणि तस्मिया रुबाब.