आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार गुरुवार 3 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ आमनेसामने असणार आहेत. या 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी एकूण 18 दिवस चढाओढ पाहायला मिळणार आहे. एकूण 18 दिवसांमध्ये क्रिकेट चाहत्यांना 23 सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील सहभागी 10 संघांना 5-5 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. सर्व 10 संघ या स्पर्धेसाठी सज्ज आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 2 सामने होणार आहेत. या सामन्यांबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बी ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध स्कॉटलँड आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर दुसरा सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर मोबाईलवर हे सामने डीज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळतील.
गुरुवारपासून टी 20 वर्ल्ड कपचा थरार
Two falcons 🦅
Two camels 🐫
10 captains 😎
ONE trophy 🏆It’s all happening in the UAE! #T20WorldCup #WhateverItTakes pic.twitter.com/cv6Te9TIsO
— ICC (@ICC) October 2, 2024
स्कॉटलंड वूमन्स टीम: कॅथरीन ब्राइस (कॅप्टन), सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस (विकेटकीपर), डार्सी कार्टर, प्रियनाझ चॅटर्जी, लोर्ना जॅक, कॅथरीन फ्रेझर, रॅचेल स्लेटर, क्लो एबेल, हन्ना रेनी, अबताहा मकसूद, आयल्सा लिस्टर, अबी एटकेन ड्रमंड, मेगन मॅकॉल आणि ऑलिव्हिया बेल.
बांगलादेश वूमन्स टीम: निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शाठी रानी, दिलारा अक्टर, शोभना मोस्तरी, ताज नेहर, शोर्ना अक्टर, रितू मोनी, सुलताना खातून, मारुफा अक्टर, नाहिदा अक्टर, जहांआरा आलम, फहिमा खातून, राबेया खान, मुर्शिदा खातून आणि दिशा बिस्वास.
पाकिस्तान वूमन्स टीम : फातिमा सना (कॅप्टन), मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, तुबा हसन, सदफ शमास, नशरा संधू, डायना बेग, इरम जावेद, ओमामा सोहेल, सय्यदा आरूब शाह आणि तस्मिया रुबाब.
श्रीलंका वूमन्स टीम : चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, सचिन निसानसाला, उदेशिका प्रबोधिनी, अचीनी कुलसूरिया, अमा कांचना, इनोशी प्रियदर्शनी आणि शशिनी गिम्हनी.