मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 41 सामन्यानंतर सेमी फायनलसाठी चौथी टीम जवळपास 99.99 टक्के निश्चित झाली आहे. न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंका टीमवर 5 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह सेमी फायनलमधील चौथ्या आणि अखेरच्या जागेसाठी दावा जवळपास निश्चित केलाय. त्याआधी टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. मात्र पाकिस्तानसाठी सेमी फायनलसाठी अजूनही 1 टक्के शक्यता आहे. त्यामुळे सेमी पहिल्या सेमी फायनलचं ठिकाण आणि टीम इंडिया कुणा विरुद्ध खेळणार हे स्पष्ट नाही.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड या शनिवारी होणाऱ्या सामन्यानंतर सेमी फायनल 1 मॅच कुठे होणार, हे निश्चित होणार आहे. कारण पाकिस्तान आवश्यक तितक्या फरकाने जिंकून सेमी फायनलसाठी पात्र ठरली तर सर्व समीकरणं बदलतील. सेमी फायनलमधील 1 विरुद्ध 4 आणि 2 विरुद्ध 3 असा सामना होणार आहे. त्यानुसार दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होणार हे निश्चित आहे. तर टीम इंडियाने सर्वात आधी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. त्यामुळे पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचल्यास टीम इंडिया विरुद्धचा सेमी फायनल 1 सामना हा कोलकातामधील ईडन गार्डन इथे होईल. तर न्यूझीलंड टीमचं कन्फर्म झाल्यास सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होईल.
दरम्यान पाकिस्तानला न्यूझीलंडला मागे टाकून सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर इंग्लंड विरुद्ध जिंकून चालणार नाही. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 11 नोव्हेंबरला होणार आहे. पाकिस्तानला हा सामना तब्बल 287 धावांच्या फरकाने जिंकावा लागेल, तेव्हाच पाकिस्तान सेमी फायनलमधील पोहचेल. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी नाही बरोबर आहे.
दरम्यान पहिला सेमी फायनल सामना हा बुधवारी 15 नोव्हेंबरला होणार आहे. तर दुसरी सेमी फायनल मॅच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणार आहे.हा सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही सामन्यांना नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टीम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, इश सोधी, कायल जेमिसन, जेम्स नीशम आणि विल यंग.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन.