कोलकाता | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडवर विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह एकूण चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली. आता त्यानंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी सेमी फायनल मॅच होणार आहे. ही मॅच जिंकणारी टीम वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळेल. टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात कोणती टीम येते,याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना गुरुवारी 16 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये इथे आयोजित करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने
Rivalries resume as two fabled foes clash for a spot in the #CWC23 Final 🏆#SAvAUS pic.twitter.com/53wq4CrVmd
— ICC (@ICC) November 16, 2023
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुक्वायो, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, लिझाद विल्यम्स, रीझा हेनसम्ड्रिक्स, रीझा हेनम्स्ड्रिक्स आणि मार्को जॅन्सन.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.