मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा जोरात सुरुवात आहे. क्रिकेट चाहत्यांना रविवारी 16 ऑक्टोबरला स्पर्धेतील पहिला उलटफेर पाहायला मिळाला. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडचा धुव्वा उडवत 8 वर्षांनी पहिला विजय मिळवला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया टीमची पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी घसरली. तर श्रीलंकेलाही अद्याप पहिला विजय मिळवता आलेला नाही. आधीच विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरलेल्या श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाका हा दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्यानंतर आता आणखी एका टीमच्या कॅप्टनवर दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.
न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन देखील वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अनेक महिन्यांच्या दुखापतीनंतर केनने कमबॅक केलं. केनने वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरुद्ध आपला पहिला सामना खेळला. केनने बांगलादेश विरुद्ध अर्धशतक ठोकत शानदार सुरुवात केली. मात्र बॅटिंगदरम्यान केनला दुखापत झाली. बांगलादेश टीमच्या खेळाडूने केलेला थ्रो केनच्या हातावर लागला. केनला दुखापत झाली.
केनचा हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला. त्यामुळे केन पुढील काही सामन्यातच नाही, तर वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. टीममध्ये केनच्या जागी टॉम बंडल याचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान न्यूझीलंड आपला वर्ल्ड कपमधील चौथा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध 18 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे.
श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाका याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. या दुखापतीमुळे दासूनला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. दासूनच्या जागी टीममध्ये चमिका करुणारत्ने याला संधी देण्यात आली. तर कुसल मेंडीस याला श्रीलंकेच्या कर्णधारपदाची सुत्रं देण्यात आली आहेत.
दरम्यान केन विलियमन्सन याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम याने न्यूझीलंडचं पहिल्या 2 सामन्यात नेतृत्व केलं. त्यामुळे केन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला, तर टॉम लॅथम याला कर्णधारदाची जबाबदारी मिळू शकते. न्यूझीलंडने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही साम्नयात विजय मिळवला आहे.