बंगळुरु | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तान टीमवर 62 धावांनी मात करत सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 368 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्ताननेही चांगली सुरुवात केली होती. मात्र पाकिस्तनची झुंज ही 62 धावांनी अपयशी ठरली. पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. ऑस्ट्रेलिया या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानला पछाडत चौथ्या स्थानी पोहचली आहे. त्यामुळे पाकिस्तानला दुहेरी फटका बसला आहे.
पाकिस्तानने विजयी धावांचं पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. अब्दुल्लाह शफीक आणि इमाम उल हक या सलामी जोडीने 134 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मार्क्स स्टोयनिस याने ही जोडी फोडली. अब्दुल्लाह 64 धावा करुन आऊट झाला. पाकिस्तानने पहिली विकेट गमावल्यानंतर त्यांच्या इतर खेळाडूंना चांगली सुरुवात मिळाली. मात्र ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं.
इमाम उल हक याने सर्वाधिक 70 धावा केल्या. कॅप्टन बाबर आझम गरजेच्या वेळेस 18 धावांवर आऊट झाला. सौद शकली 30 रन्स करुन माघारी परतला. इफ्तिखार अहमद 26 धावा करुन आऊट झाला. मोहम्मद रिझवान याने 46 धावांचं योगदान दिलं. उस्मा मीर आला तसाच झिरोवर आऊट झाला. हसन अली 8 धावांवर आऊट करुन बाद झाला. शाहीन अफ्रिदी याने 10 धावा केल्या. तर हरीस रौफ शून्यावर नाबाद परतला.
कांगारुंचा सलग दुसरा विजय
Australia overcome the Pakistan challenge in Bengaluru to make it two in two at #CWC23 👊#AUSvPAK 📝: https://t.co/TAoZkxKoHP pic.twitter.com/OdCVA0ldbl
— ICC (@ICC) October 20, 2023
ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मार्क्स स्टोयनिस आणि पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाीठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने 259 धावांची भागीदारी रचत वैयक्तिक शतकं केली. डेव्हिड वॉर्नर याने 163 आणि मिचेल मार्श याने 121 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानला झटपट धक्के देत 259-1 वरुन 49.2 ओव्हरमध्ये 9 बाद 363 या स्कोअरपर्यंत आणून थांबवलं.
ऑस्ट्रेलियाला 400 प्लस करण्याची संधी होती. मात्र शाहीन आफ्रिदी याने 5 विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरमध्ये 367 धावाच करता आल्या. पाकिस्तानडून शाहीन व्यतिरिक्त हरीस रौफ याने 3 विकेट्स घेतल्या. तर उस्मा मीर याच्या खात्यात 1 विकेट गेली.
दरम्यान एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पाकिस्तानचं ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं वाजवण्यात आलं. मात्र त्यानंतरही पाकिस्तानचा पराभव झाला. टीम इंडिया विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे डायरेक्टर मिकी आर्थर याने बीसीसीआयवर आरोप केले होते.भारत-पाक सामन्यादरम्यान दिल दिल पाकिस्तान हे गाणं वाजवण्यात न आल्याचा दावा हा आर्थर यांनी केला होता.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.