बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात आला. पाकिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन बाबर आझम याने पहिले बॉलिंगचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. त्यामुळे पाकिस्तानचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाला किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी होतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन पॅट कमिन्स याने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर पाकिस्तानने एक बदल केला आहे. शादाब खान याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर ओसामा मीर याला प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी दिली आहे. शादाब खान याला आतापर्यंत मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे शादाबला डच्चू देण्यात आला. त्यामुळे ओसामा मीर या संधीचा किती फायदा घेतो हे पाहावं लागेल.
दरम्यान आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ एकूण 10 वेळा भिडले आहेत. या 10 सामन्यांपैकी 6 सामन्यात कांगारु वरचढ राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाने 6 मॅचमध्ये पाकिस्तानला धुळ चारली आहे. तर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर 4 वेळा विजय मिळवला आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप 2023 मधील चौथा सामना आहे. ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर पाकिस्तानने 3 मधून 2 वेळा विजय मिळवलाय. त्यामुळे आता या सामन्यात कोण विजयी होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकला
📸🪙#AUSvPAK | #DattKePakistani | #WeHaveWeWill pic.twitter.com/NsYsrRSDuc
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 20, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.