लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 10 वा सामना हा 12 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमेनसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलंय. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेचं कर्णधारपद आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत.
ऑस्ट्रेलियाची यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमधील सुरुवात पराभवाने झाली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. तर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 7 ऑक्टोबर रोजी 102 धावांनी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिका ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया सातव्या क्रमाकांवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रयत्न करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा विजयी खातं उघडण्याचा प्रयत्न असेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. विविध भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना कॉमेंट्रीचा आनंद घेता येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर फुकटात पाहता येईल. मात्र त्यासाठी क्रिकेट चाहत्यांना डिज्नी प्लस हॉटस्टार हा एप डाऊनलोड करावा लागेल.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी .