लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 13 व्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना मोठा उलटफेर पाहायला मिळाला. इंग्लंडच्या तुलनेत कमजोर असलेल्या नवख्या अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडवर 69 धावांवर विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला विजय ठरला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 284 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा 215 धावांवर बाजार उठला. आता यानंतर वर्ल्ड कपमधील 14 वा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमधील आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे दोन्ही टीम आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. ऑस्ट्रेलियाला टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकाकडून पराभव स्वीकारावा लागला. तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानने पराभवाची धुळ चारली. त्यामुळे आता आपल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांचा असेल. मात्र विजय कुणा एका टीमचाच होणार. हा सामना कधी, कुठे होणार. मॅच टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल हे आपण जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना सोमवारी 16 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहता येईल.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, दुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथीशा पथिराणा, दिलशान मधुशंका आणि दुशन हेमंथा.