Icc World Cup 2023 साठी बीसीसीआयची मोठी घोषणा, क्रिकेट चाहत्यांना गूड न्यूज

| Updated on: Oct 05, 2023 | 6:01 PM

Icc World Cup 2023 | बीसीसीआयने खरंतर हा निर्णय आधीच घेण्याची गरज होती. मात्र अखेर बीसीसीआयने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चा मुहुर्त साधत हा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना गूड न्युज दिली आहे.

Icc World Cup 2023 साठी बीसीसीआयची मोठी घोषणा, क्रिकेट चाहत्यांना गूड न्यूज
Follow us on

मुंबई | क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर आला. आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा आज 5 ऑक्टोबरपासून श्रीगणेशा झाला. क्रिकेट चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वर्ल्ड कप सुरु होण्याची वाट पाहत होते. आता 45 दिवस 48 सामन्यांचा थरार रंगणार आहे. तसेच सलामीचा सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होत आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्याआधी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी गूड न्यूज दिली आहे. जय शाह यांनी ट्विटद्वारे चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे.

वर्ल्ड कप दरम्यान स्टेडियममध्ये सामना पाहायला येणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना मोफत पाणी देण्यात येणार आहे. जय शाह यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “मला जाहीर करताना अभिमान वाटतो आम्ही देशातील सर्व स्टेडियममध्ये क्रकेट चाहत्यांना मोफत बाटलीबंद पाणी देणार आहोत”, असं जय शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जय शाह यांनी केलेलं ट्विट हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या निर्णयासाठी बीसीसीआयचे आभार मानले जात आहेत.

स्टेडियममध्ये पाणी आणि खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दरात विकले जातात. क्रिकेट चाहत्यांची एका अर्थाने लुटच केली जाते. पाण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना 50 आणि त्यापेक्षा जास्त रुपये खर्चावे लागतात. आता बीसीसीआय फुकटात पाणी देणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची लुट थांबणार आहे. तसेच थोडेफार का होईना पण पैशांची बचत होणार आहे.

बीसीसीआय सचिव जय शाह यांचं ट्विट

एकूण 10 स्टेडियममध्ये 48 सामने

आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये 45 साखळी, 2 सेमी फायनल आणि 1 फायनल असे एकूण 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे 48 सामने देशातील 10 शहरांमधील स्टेडियममध्ये होणार आहेत. या 10 स्टेडियममध्ये सामन्यावेळेस क्रिकेट चाहत्यांना पिण्याचं पाणी बीसीसीआयकडून उपलब्ध करुन दिलं जाणार आहे.

न्यूझीलंडला 283 धावांचं आव्हान

दरम्यान वर्ल्ड कप सलामीच्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 282 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रुट याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडकडून मॅट हेनरी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, आदिल रशीद आणि मार्क वुड.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री आणि ट्रेन्ट बोल्ट.