IND vs ENG Toss : इंग्लंडने टॉस जिंकला, दोन्ही संघांच्या कॅप्टनने खेळली एकच चाल!

| Updated on: Oct 29, 2023 | 2:13 PM

IND vs ENG Toss : भारत आणि इंग्लंडमधील सामन्याला सुरूवात झाली आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आजच्या सामन्यात सारखीच चाल खेळली आहे. नेमकी ती चाल कोणती आहे जाणून घ्या.

IND vs ENG Toss : इंग्लंडने टॉस जिंकला, दोन्ही संघांच्या कॅप्टनने खेळली एकच चाल!
Follow us on

मुंबई : भारत आणि इंग्लंड सामन्यामध्ये जोस बटलर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल. आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांमध्ये बदल केला जाईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र दोन्ही संघांनी एकच चाल खेळली असून संघात कोणताही बदल केला नाही. भारताचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन याला संघात जागा मिळणार असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. मात्र दोन्ही संघांनी संघामध्ये कोणताही बदल न करता मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे.

भारताचा खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्धच्याही सामन्याला मुकला आहे. या सामन्यामध्ये रोहित संघात काय बदल करणार याकडे सर्वांचं  लक्ष लागलं होतं. लखनऊच्या मैदानावर याआधी झालेल्या  वर्ल्ड कपमधील सामन्यांमध्ये स्पिनर्सला जास्त मदत मिळाली आहे. त्यामुळे अश्विनसला अनुभवी खेळाडू म्हणून संघात जागी देण्यात येईल असं वाटलं होतं मात्र तसं काही झालं नाही.

हार्दिकची जागा भरून काढण्यासाठी रोहितने संघात सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना संघात स्थान दिलं आहे. दोघांमधील शमीने मिळालेल्या संधीचं सोनं करत पाच विकेट घेतल्या होत्या. तर सूर्याला  अद्याप काही चमक दाखवता आली नाही.

इंग्लंड संघाला अद्याप गतविजेते असल्यासारखा खेळ दाखवता आला नाही. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांमधील अवघ्या एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये अजिंक्य राहिलेल्या भारताविरूद्ध संघात बदल होतील अशी सर्वांना आशा होती मात्र इंग्लंडनेही तोच संघ खेळवण्याचा निर्णय घेतला.

आजच्या सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड