अहमदाबाद | गुरुवार 5 ऑक्टोबरपासून आयसीसी विश्व चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. सर्व खेळाडूंनी नेट्समध्ये खूप घाम गाळला आहे. एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सज्ज आहेत. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल, हे आपण जाणून घेणार आहोत.
आशिया कप 2023 स्पर्धेपासून ते आतापर्यंत अनेक सामने हे रद्द झाले आहेत. तर काही सामने पावसामुळे कमी षटकांचे झाले. आयसीसी वर्ल्ड कपमधील सराव सामन्यात पावसाने खोडा घातला. टीम इंडियाचे दोन्ही सराव सामने हे टॉसशिवाय रद्द करावे लागले. पावसामुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपआधी सराव करायला मिळाला नाही. त्यामुळे आता पहिल्या सामन्यातही पाऊस एन्ट्री घेत खेळखंडोबा करणार का, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
हवामान खात्यानुसार,दुपारी दीड दरम्यान हवामान स्वच्छ असेल. आकाश स्वच्छ असेल. तसेच अहमदाबादमधील कमाल वातावरण 35 डिग्री सेल्सियन असेल. सामन्यादरम्यान उन असेल. तसेच 22 किमी वेगाने वारे वाहतील. मात्र या सामन्यात पावसाची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळेल.
इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.
पहिल्या सामन्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट टीम | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, ईश सोधी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, मिचेल सँटनर आणि जेम्स नीशम.