नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील नवव्या सामन्या टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिममध्ये करण्यात आलं आहे. अफगाणिस्तान आणि टीम इंडिया या दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील हा दुसरा सामना आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडला. अफगाणिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तान टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. टीम मॅनेजमेंटने अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला विश्रांती दिली आहे. तर अश्विनच्या जागी टीममध्ये ऑलराउंडर शार्दुल ठाकुर याचा समावेश केला आहे. शार्दुलला गेल्या काही सामन्यांमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे शार्दुलला आता अफगाणिस्तान विरुद्ध दमदार कामगिरी करुन कमबॅक करण्याची संधी आहे.
दरम्यान विराट कोहली हा आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहे. अरुण जेटली स्टेडियम विराटचं घरचं मैदान आहे. विराटचा हा अखेरचा वर्ल्ड कप असल्याचं म्हटलं जातंय. त्यानुसार विराटचा वर्ल्ड कपमधील आपल्या होम ग्राउंडमधील हा अखेरचा सामना आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना निर्णयाक क्षणी 85 धावांनी विजयी खेळी साकारली होती. त्यामुळे आता अफगाणिस्तान विरुद्धही चाहत्यांना विराटकडून होम पीचवर मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
अफगाणिस्तानने टॉस जिंकला
🚨 𝐖𝐄 𝐖𝐈𝐋𝐋 𝐁𝐀𝐓 𝐅𝐈𝐑𝐒𝐓 🚨
Afghanistan Skipper @Hashmat_50 has won the toss and decided that Afghanistan will bat first against @BCCI. 👍#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvIND | #WarzaMaidanGata pic.twitter.com/0wiyfNtndt
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 11, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.