चेन्नई | टीम इंडिया भारतात 12 वर्षानंतर पुन्हा एकदा आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेतील एकूण 10 संघांचे सर्व खेळाडू हे आता निश्चित झाले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. एकूण 45 दिवसात 48 सामने पार पडणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी येत्या काही दिवसात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यासाठीही चाहत्यांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे.
टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया टीमचाही हा पहिलाच सामना असणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत खेळवण्यात येणार आहेत. हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असू शकते, हे आपण जाणून जाणून घेऊयात.
डेव्हिड वॉर्नर ओपनिंग करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. ट्रेव्हिस हेड पूर्णपणे फिट झाला तर तो वॉर्नरसोबत सलामीला येऊ शकतो. हेड बॅटिंगसोबत बॉलिंगही करतो. वॉर्नरने टीम इंडिया विरुद्ध नुकत्या झालेल्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती.
त्यानंतर मिचेल मार्श वनडाऊन येऊ शकतो. तर अनुभवी स्टीव्हन स्मिथ हा चौथ्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी खेळण्यासाठी येऊ शकतो. तसेच टीममध्ये ग्लेन मॅक्सवेल परतल्याने ऑस्ट्रेलियाची बाजू आणखी मजबूत झाली आहे. मॅक्सवेल ऑलराउंडर आहे. त्यामुळे तो सहाव्या क्रमांकावरही बॅटिंगसाठी येऊ शकतो.
मॅक्सवेल याच्याआधी कॅमरुन ग्रीन किंवा मार्कस स्टोयनिस हे खेळू शकतात. हे दोघे फार आक्रमक आहेत. तसेच दोघांमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे हो दोघे ऑस्ट्रेलियासाठी हुकमाचे एक्के ठरु शकतात. एलेक्स कॅरी यानंतर बॅटिंगसाठी येऊ शकतो.
एडम झॅम्पा हा प्रमुख गोलंदाज असणार आहे. ट्रेव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघे झॅम्पाची साथ देतील. तसेच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे तिघे वेगवान गोलंदाजाची जबाबदारी सांभाळतील.
आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलिया संभावित प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) ट्रेव्हिस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), एडम झॅम्पा, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुड.