Shubman Gill ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार नाही! हेड कोच राहुल द्रविड काय म्हणाले?

| Updated on: Oct 06, 2023 | 8:20 PM

Team India Rahul Dravid On Shubman Gill | शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळणार की नाही? टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी शुबमन गिल याच्याबाबत काय माहिती दिली?

Shubman Gill ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार नाही! हेड कोच राहुल द्रविड काय म्हणाले?
Follow us on

मुंबई | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळणार आहे.हा सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियावर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. तसेच वर्ल्ड कपसाठी जोरदार सरावही केला आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज आहे. मात्र पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली.

टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल याला डेंग्यु झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यामुळे शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विुरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाचा खेळाडू हा आजारपणामुळे खेळणार नसल्याने टीम इंडियाची ताकद कमी झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी शुबमन गिल याच्याबाबत अपडेट दिली आहे.

राहुल द्रविड काय म्हणाले?

“शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झालेला नाही. शुबमन आजारी आहे. मात्र त्याला आता बरं वाटतंय. वैद्यकीय पथक शुबमनकडून लक्ष ठेवून आहे. अजूनही आमच्याकडे 36 तासांचा कालावधी आहे. आता मेडिकल टीम काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे. आम्ही गिलवर लक्ष ठेवून आहोत. शुबमनला 8 ऑक्टोबरपर्यंक कसं वाटतंय याकडे आम्ही लक्ष ठेवू. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी शुबमन खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल”, अशी माहिती द्रविड यांनी दिली.

दरम्यान शुबमन गिल याला आजारामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळता न आल्यास रोहित शर्मा याच्यासोबत ओपनिंगला कोण येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत कॅप्टन रोहितसोबत ईशान किशन ओपनिंग करु शकतो.

शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार की नाही?

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.