चेन्नई | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सुरुवात रविवार 8 ऑक्टोबरपासून करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध असणार आहे. टीम इंडिया कोणताही सराव सामना न खेळता थेट मुख्य स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचे दोन्ही सराव सामने हे पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे टीम इंडियाला सरावाची संधीच मिळाली नाही. टीम इंडियाचा पहिला सामना हा गतविजेत्या इंग्लंड आणि दुसरा सामना हा नेदरलँड्स विरुद्ध होता. त्यामुळे टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्याची पाऊस वाट लावणार नाही ना, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. सामन्याच्या दिवशी हवामाना कसं असेल हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. हा सामना चेन्नईतील एम ए चिंदबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याच्या एकदिवसआधी शनिवारी रिमझिम पाऊस होत आहे. एक्युवेदरनुसार, रविवारी सामन्यादरम्यान जोरदार पाऊस नाही. मात्र संध्याकाळी पाऊस एन्ट्री घेऊ शकतो. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन हे ओपनर बॅट्समन शुबमन गिल याच्यामुळे वाढलंय. शुबमन गिल याला डेंग्युची लागण झाली आहे. शुबमनला कोणतीही दुखापत नाही. मात्र तो आजारी आहे. त्यामुळे शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार की नाही, हे अजून निश्चित नाही. मात्र शुबमन खेळणार नसेल, तर टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.