IND vs BAN Head To Head | टीम इंडिया-बांगलादेश आमनेसामने, दोघांपैकी वरचढ कोण?

| Updated on: Oct 19, 2023 | 12:22 AM

India vs Bangladesh Head To Head Records | टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात वनडे वर्ल्ड कपमधील रंगतदार सामना क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया-बांगलदेश यांच्यात कोण वरचढ आहे जाणून घ्या.

IND vs BAN Head To Head | टीम इंडिया-बांगलादेश आमनेसामने, दोघांपैकी वरचढ कोण?
Follow us on

पुणे | यजमान टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सुरुवात अगदी दणक्यात केलीय. टीम इंडियाने आपल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवलाय. टीम इंडियाने आपल्या अखेरच्या मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. त्याआधी अफगाणिस्तानला लोळवलं. तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्याच्या तयारीत आहे. तर बांगलादेश 3 पैकी 1 मॅच जिंकलीय. तर दोन वेळा पराभूत झालीय.

बांगलादेश उलटफेर करण्यात माहीर आहे. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेशला हलक्यात घेणार नाही. कारण याच बांगलादेशने टीम इंडियाला 2007 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पराभूत करत पॅकअप केलं होतं. तसेच नुकताच आशिया कप 2023 स्पर्धा पार पडली. टीम इंडियाने 2018 नंतर आशिया कप जिंकला. टीम इंडियाने या स्पर्धेत गमावलेला एकमेव सामना हा बांगलादेश विरुद्धचा होता. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेशपासून जरा जपूणच खेळणार आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघातील आकडेवारी आपण जाणून घेऊयात.

वनडेमध्ये दोघांपैकी भारी कोण?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ वनडेमध्ये एकूण 40 सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. टीम इंडियाने 40 पैकी 31 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने 8 वेळा उलटफेर करत टीम इंडियाला धडा शिकवलाय. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. तर दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये एकूण 4 वेळा भिडले आहेत. इथेही टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवलाय. तर बांगलादेशने एकदाच टीम इंडियाला पराभूत करत 2007 वर्ल्ड कपमधून बाहेर केलं होतं.

धक्कादायक आकडेवारी

दरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 सामन्यात बांगलादेश टीम इंडियावर वरचढ राहिलीय. बांगलादेशने 4 पैकी 3 सामन्यात टीम इंडियावर मात केलीय. तर टीम इंडियाला फक्त एकदाच जिंकता आलं आहे. त्यामुळे बांगलादेश कशाप्रकारे उलटफेर करण्यात माहिर आहे , हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.

आयसीसी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

बांगलादेश टीम | शकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन कुमेर दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (विकेटकीपर), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन रहमान, मुस्तफीर रहमान , हसन महमूद , शोरीफुल इस्लाम आणि तनझिम हसन साकीब.